Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरटकरला कोर्टात आणण्यापूर्वीच शेकडो शिवप्रेमी न्यायालयाबाहेर, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिस स्टेशनबाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळली.

कोरटकरला कोर्टात आणण्यापूर्वीच शेकडो शिवप्रेमी न्यायालयाबाहेर, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कोरटकरवर शिवप्रेमी संतप्त
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 12:18 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहासकार इंद्रजित सावंतना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला असून आज त्याला कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला आणणण्यात आलं. डीवायएसपी अजित टिक्के हे राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीची कसून चौकशी करत आहेत. थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारीकोरटकरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आह. मात्र त्यापूर्वीच जुना राजवाडा पोलिस स्टेशनबाहेर शिवप्रेमींची गर्दी उसळली आहे.

प्रशांत कोरटकर याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी दाखल झाले असून ते संतप्त आहेत. एक शिवप्रेमी तर हातात कोल्हापूरी चप्पल घेऊनच पोलीस स्टेशनबाहेर उभा आहे. 9 नंबरचं पायताण मी घेऊन आलोय, ते बरोब्बर त्याच्या गालावर उठावयचं आहे अशी भावना एका इसमाने व्यक्त केली आहे. आम्ही सगळे शिवभक्त इतके संतापलो आहोत. ज्या पद्धतीने त्याने छत्रपतींचा अवमान केला आहे आणि ज्या पद्धतीने तो राजरोसपणे फिरतोय, जणू त्याला काही फरकच पडत नाही असा त्याचा आव आहे. म्हणून त्याला कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी ही कोल्हापुरी चप्पल आणलीये अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोरटकर जावई आहे का ?

सध्या त्याला खरोखर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळताना दिसत्ये, असा आरोपही शिवप्रेमींकडून केला जात आहे. आत्तापर्यंत कुठलाही आरोपी अटकेत असतो, तेव्हा त्याला तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेतात, पण या कोरटकरला, चिल्लर माणसाला, त्याची तपासणी करण्यासाठी सरकारी दवाखान्यातले डॉक्टर पोलीस स्टेशनला आलेत, तो काय एवढा मोठा आहे ? जावई आहे का ?असा संतप्त सवालही शिवप्रेमींनी विचारला आहे.

विधानभवनाच गृहमंत्री म्हणतात की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, पण त्याच चिल्लर माणसाला शोधायला तुम्हाला एक महीना लागतो. त्यानंतरही त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची मेडिकल टेस्ट ही पोलिस स्टेशनमध्येच केली जाते. हाँ तर गृहखात्याचा जावई असल्यासारखीच वागणूक त्याला मिळत्ये, अशी टीका आणखीएका शिवप्रेमी इसमाने केली.

कोरटकरची भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत

शिवरायांबद्दल गरळ ओकणारा प्रशांत कोरटकर याची चंद्रपुरात कथित भेट घेणारे पोलिस अधिकारी महेश कोंडावार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महेश कोंडावार हे चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. मात्र त्यांची बरोबर पंधरा दिवसपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. यामुळे नाराज असलेले गुंडावर तेव्हापासून कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. ते अजूनही रजेवर आहेत. दरम्यान, इंद्रजीत सावंत प्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकर हा अकरा मार्च रोजी चंद्रपुरात मुक्कामी आला असता त्याची भेट कोंडावार यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. अनुषंगाने कोल्हापूर पोलिसांनी हॉटेलचे सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून, त्यात जर कोंडावार आढळले, तर त्यांच्यावर मोठी कारवाई होऊ शकते. प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे असल्याने आपण काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रपूर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिली.

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.