Flood | प्रसूतीच्या मरणांत वेदना, त्यात वरुणराजाचा उग्रावतार, माऊलीची दीड किमी फरफट, मोखाड्यात बाळ आलं, आईचाही पुनर्जन्म
मोखाडा तालुक्यातील बोटोशी हे अतिदुर्गम भागात वसलेले गाव आहे. या गावठाणातील सविता दिलीप नावळे (26) या गर्भवती महिलेला बुधवारी दुपारनंतर प्रसुतीच्या कळा येऊ लागल्या. दुपारनंतर या कळा असह्य होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, गावात ना वाहन ना वाहतुकीसाठी रस्ता. त्यामुळे कुटूंबातील व शेजारच्या महिलांनी प्रसंगावधान ओळखून सविता ला तेथुन मुसळधार पावसात सुमारे दिड किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले.
पालघऱ : (Vadarbha Rain) जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. सततच्या पावसाचा परिणाम शेत शिवारावर तर झालेला आहेच पण जनजीवनही विस्कळीत झाले आहे. असाच प्रसंग जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या बोटोशी गावठाण परिसरात घडला आहे. (pregnant woman) गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी तब्बल दीड कोलोमिटरची पायपीट करावी लागली आहे. गावात ना वाहनाची सोय ना रस्ता. यामुळे (Heavy Rain) मुसळधार पावसामध्ये दीड कोलोमिटरचा प्रवास करुन मुख्य रस्ता जवळ करावा लागला होता. मुख्य रस्त्यावर खोडाळा येथील प्राथमिक आरोग्या केंद्राची रुग्णवाहिका मागवून घेऊन अखेर त्या महिलेची प्रसुती करण्यात आली.
दीड किलोमिटर पायपीट केल्यानंतर उपचार
मोखाडा तालुक्यातील बोटोशी हे अतिदुर्गम भागात वसलेले गाव आहे. या गावठाणातील सविता दिलीप नावळे (26) या गर्भवती महिलेला बुधवारी दुपारनंतर प्रसुतीच्या कळा येऊ लागल्या. दुपारनंतर या कळा असह्य होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, गावात ना वाहन ना वाहतुकीसाठी रस्ता. त्यामुळे कुटूंबातील व शेजारच्या महिलांनी प्रसंगावधान ओळखून सविता ला तेथुन मुसळधार पावसात सुमारे दिड किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. दरम्यानच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका दाखल झाली होती.
तातडीने उभारली यंत्रणा
गर्भवती महिलेला खोडाळा येथील प्राथिमक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केल्यानंतर तेथून पुढचे उपचार वेगात करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने यंत्रणा राबवीत सविताची प्रसुती केली. गावच्या महिला आणि वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे सविता आणि तीच्या नवजात बाळाचे प्राण वाचले आहेत.
घटना नेहमीच्याच लोतप्रतिनीधींचे दुर्लक्ष
मोखाडा तालुक्यातील काही गावे ही अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी भर पावसाळ्यात अशा घटना घडतातच. अनेकवेळा रस्त्याअभावी प्राणाशी मुकावेही लागले आहे. असे असतानाही पक्का रस्ता करण्याकडे लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची हीच समस्या कायम आहे. त्यामुळे किमान रस्त्याचे काम तरी लोकप्रतिनीधींनी करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.