Gadchiroli Gram Panchayat | गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी, 486 मतदान केंद्रांवर मतदान
सकाळी 7.30 ते ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Gadchiroli Gram Panchayat Election 2021)
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (20 जानेवारी) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या 150 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या 20 जानेवारीला सकाळी 7.30 ते ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. (Gadchiroli Gram Panchayat Election 2021)
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आमि सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संबंधित गावातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या सहा तालुक्यातील 150 ग्रामपंचायतीमधील 2 लाख 49 हजार 638 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 486 प्रभागामधून 1170 जागांसाठी 2815 उमेदवार रिंगणात आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून 2166 कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे सर्व कर्मचारी 486 मतदान केंद्रावर आवश्यक साहित्य घेऊन पोहोचत आहेत.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचे निकाल
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या 1600 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक जागांवर शिवसेना जिंकलेली आहे. उरलेल्या 13,833 जागांपैकी 13,769 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही जागांचे निकाल तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने 3,263, राष्ट्रवादीने 2,999, शिवसेनेने 2,808, काँग्रेसने 2,151, मनसेने 38 आणि स्थानिक गटांनी 2,510 जागा जिंकल्या आहेत.
या निकालावरून महाविकास आघाडी आणि युती अशी तुलना केल्यास महाविकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे सुमारे 8 हजाराहून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर युतीकडे तीन हजाराहून अधिक जागा आलेल्या दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मैदान मारल्याचं दिसून येत आहे. पण, राजकीय पक्षनिहाय विचार करता सर्वाधिक जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. मनसे, रिपाइं, वंचित बहुजन आघाडीलाही या निवडणुकीत जेमतेम जागा मिळाल्या आहेत. (Gadchiroli Gram Panchayat Election 2021)
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय