भाजपच्या ‘या’ रणनीतीमुळे शिंदे गटातील खासदार अस्वस्थ

| Updated on: May 30, 2023 | 11:39 AM

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन मतभेद सुरु आहे. त्याचवेळी भाजप अन् शिवसेना युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. युतीमध्ये दावे-प्रतिदावे करत २०२४ ची तयारी सुरु केली आहे.

भाजपच्या या रणनीतीमुळे शिंदे गटातील खासदार अस्वस्थ
Follow us on

चंदन पुजाधिकारी, नाशिक : राज्यात गेल्या १० महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. शिवसेनेने भाजपशी घरोबा करून मुख्यमंत्रीपद घेतले. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. आगामी निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवणार आहे. परंतु भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक १३ शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांमध्येही आपली तयारी सुरु केली आहे. भाजपने चालवलेल्या या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवरच सावध शिंदे गटाकडून २२ जागा लढण्याचा दाव केला गेला. त्याचवेळी भाजपने शिंदेंच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये समांतर प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

काय केले भाजपने

शिंदें गटाचा दावा असलेल्या मतदार संघात भाजपाने संयोजक नेमले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात देखील भाजपाने संयोजक नेमले आहेत. या मतदार संघात भाजपाने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात देवयानी फरांदे यांना
तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबबदारी दिली आहे. हे भाजपाचे दबावतंत्र आल्याची शिंदे गटात कुजबुज सुरु झालीय.

हे सुद्धा वाचा

का सुरु केली भाजपने तयारी

कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील? याबाबत अजून निर्णय झालेला नाही. यामुळे हा मतदार संघ कोणाकडे आहे, याचा विचार न करता तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल, ते नंतर ठरणार आहे. परंतु आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे म्हणून काही करण्याची गरज नाही, असे अजिबात समजू नका, असे निर्देश खालपर्यंतच्या यंत्रणेला दिले गेले आहेत. तसेच भाजपइतकी संघटनात्मक रचना शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे.

शिंदे गटाची काय आहे तयारी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांची नुकतीच बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.