शरद पवारांना आधी खुर्चीवर बसवलं, आपल्या हातानं पिण्यासाठी पाणी दिलं, पंतप्रधान मोदींनी सर्वांचं मन जिंकलं
आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांची देखील उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. ते विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या टिकेला जशासतस प्रत्युत्तर देतात. मात्र त्यासोबतच ते विरोधी पक्षातील नेत्यांचा योग्य तो सन्मान देखील करतात. हे आज पुन्हा एकदा दिसून आलं आहे. आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांची देखील उपस्थिती होती. शरद पवार यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमातील हा प्रसंग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. तसेच त्यांनी स्वत:च्या हातानं बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासामध्ये त्यांना पिण्यासाठी ओतलं. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीनं सर्वांचं मन जिकलं आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi and NCP chief Sharad Pawar at the inauguration of the 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan.
(Source: DD News) pic.twitter.com/W2TJpqyeqv
— ANI (@ANI) February 21, 2025
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आज दिल्लीमध्ये मराठी भाषेचा हा गौरवशाली कार्यक्रम आयोजित होत आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. देशात आणि जगात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.
केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांच्या कविता, राम गणेश गडकरींचे नाटक यातून राष्ट्रप्रेमाची धारा निघाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्याचं काम मराठी भाषेनं केलं, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.