पंतप्रधान मोदींचे मिशन विधानसभा ! आज मुंबई दौरा, विविध विकास कामांचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज , अर्थात 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असून यावेळी ते अनेक विकास कामांचे भूमीपूजन तसेच लोकार्पणही करणार आहे. 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पाची पायाभरणीही ते करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे मिशन विधानसभा ! आज मुंबई दौरा, विविध विकास कामांचे करणार लोकार्पण
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 9:41 AM

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( शनिवार 13 जुलै) पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे. त्यादरम्यान पंतप्रधान मोदी मुंबईला कोट्यवधी रुपयांची प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटनही करतील. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरील नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करतील. तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. तसेच घोषणा होऊन नऊ वर्ष रेंगाळलेल्या ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. आता लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्या दृष्टीनेच पंतप्रधान सतत महाराष्ट्राचे दौरे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कसा असेल दौरा ?

मुंबई दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी प्रथम NESCO प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते हजारो कोटींच्या प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवतील, त्यानंतर पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील INC सचिवालयाला भेट देतील. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील. रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील.

त्यानंतर नवीन INS टॉवर्सचे उद्घाटन करण्यासाठी संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय वृत्तसेवा (INS) सचिवालयाला भेट देतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यात ते अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. या बोगद्यामुळे प्रवासाचा सुमारे 1 तासाचा वेळ वाचणार आहे.

प्रशिक्षण योजनाही करणार लाँच

6,300 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तो गोरेगावमधील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडेल. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येणार आहे. तसेच नवी मुंबईत कल्याण यार्ड रीमॉडेलिंग प्रकल्प आणि गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल देखील सुरू करणार आहे. आज पंतप्रधान हे 5,600 कोटी रुपयांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू करतील. तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि 18 ते 30 वयोगटातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.