बहीण प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं, भाऊ धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना म्हणाले…

प्रीतम मुंडे यांचे भाऊ समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे प्रार्थना केली आहे. त्यांनी ट्विटद्वारे प्रीतम मुंडे यांना काळजी घेण्याचेसुद्धा आवाहन केले आहे. (pritam munde corona symptoms dhananjay munde)

बहीण प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं, भाऊ धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना म्हणाले...
DHANANJAY MUNDE PRITAM MUNDE
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 11:56 PM

मुंबई : “प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल. ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो,” अशी भावनिक प्रार्थना समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. भाजप खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांना कोरोनासदृश लक्षणं दिसू लागली आहेत. बीड जिह्यात दौरा करुन मुंबईला परतल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि ताप जाणवतोय. हे कळताच प्रीतम मुंडे यांचे भाऊ समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांनी वरील प्रार्थना केली. त्यांनी ट्विटद्वारे प्रीतम मुंडे यांना काळजी घेण्याचेसुद्धा आवाहन केले. ( MP Pritam Munde have Corona symptoms Dhananjay Munde prayed for her health)

धनंजय मुंडे यांनी काय ट्विट केलं ?

प्रीतम मुंडे यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे सध्या त्या क्वॉरन्टाईन आहेत. ही गोष्ट समजताच धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली त्यांनी एक भावनिक ट्विट केलंय. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो,” असे धनंजय मुंडे यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं ?

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली आहेत. त्यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा केला होता. त्यानंतर मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. असं असलं तरी त्या घरीच विलगीकरणात थांबल्या आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधला

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “मागील आठवड्यात 14 ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा 18 एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर 2-3 दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी 21 एप्रिल रोजी RTPCR चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.”

प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये साब्दिक युद्ध

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामधील कोरोनास्थितीवरुन धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या चांगलीच शाब्दिक लढाई रंगली होती. बीडमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात धनंजय मुंडे अपयश ठरल्याची टीका करत प्रीतम मुंडे यांनी करत धनंजय मुंडे यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला होता. तर धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडेंवर पलटवार करत त्यांना अचानक जिल्हयात आल्यानं उशिरा शहाणपण आल्याचा टोला लगावला होता. मात्र, असे असले तरी आता धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.

इतर बातम्या :

सर्व शब्द झेलत होतास..हा शब्द का ओलांडलास..तू बेटा जगायचं होतंस अजून..! गोविंद मुंडेंच्या निधनानं पंकजा मुंडे भावूक

पालकमंत्र्यांनी आत्मपरिक्षण करावं, प्रीतम मुंडेंचा टोला, अचानक जिल्ह्यात आल्याने उशिरा शहाणपण, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

 बीडच्या पालकमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावं, प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेवर निशाणा

( MP Pritam Munde have Corona symptoms Dhananjay Munde prayed for her health)

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.