Pritam Munde : प्रीतम मुंडेंकडून राजेश टोपेंचं कौतुक तर राज ठाकरेवर नाराजी, ऐका काय म्हणाल्या?
राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय.
मुंबई : आजपर्यंत आपण कोरोनाकाळात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भ्रष्टाचार केला असेच आरोप फडणवीसांपासून ते इतर सर्व भाजप नेत्यांकडून ऐकले आहे. मात्र आता पहिल्यांदाच कुठल्या तरी भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात केलेल्या राज्य सरकारच्या कामचे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याही कामाचे कौतुक केले आहे. राजकारणातले मतभेद विसरून टोपेंच्या कामचे कौतुक करणाऱ्या नेत्या आहेत भाजप खासदार प्रीतम मुंडे(Pritam Munde). कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय.
कोरोनाकाळात एकजुटीने लढा
कोरोनाची पहिली लाट आणि दसरी लाट ही जगाला धडकी भरवणारी होती. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. पहिल्या लाटेच्या महाराष्ट्रालाही सर्वात जास्त झळा सोसाव्या लागल्या. मात्र आरोग्य यंत्रणा आणि सरकारने सचोटीने ही लाट थोपण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आरोग्यमंत्री प्रशासन सतत अलर्ट मोडवर ठेवलं. त्यामुळे अनेक जिल्ह्यात केलेल्या कामाचं देशपातळीच्या पुढे जाऊन कौतुक झालं. तसेच मुंबई महापालिकेत झालेल्या कामचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनेही केलं. कोरोनाकाळात राज्याने एकजुटीने कोरोनाशी लढा दिला, त्यामुळे बऱ्यात बिपरीत गोष्टी टळल्या.
टोपेंचं मोकळ्या मनाने कौतुक
अचानक आलेली विषमता अस्वस्थ करणारी
तसेच आता राज्यात मशीदीवरील भोंग्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.. आता राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या मात्र त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे. आजचा हा विषय नसला तरी कधीना कधी राजकीय लोकांना सामोरे जावं लागणार असल्याची खंत खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केलीय. राज्यात सध्या याच मुद्यावरून महाविकास आघाडी आणि मनसे आमनेसामने आले आहेत. तर भाजपनेही याबाबत मनसेचं समर्थन केले आहे.