Anant Chaturdashi 2022: विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; फुलांची उधळण करत जळगावकरांचा लाडक्या बाप्पाला निरोप

आज अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. आज राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पहायला मिळत आहे. जळगावकर देखील आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Anant Chaturdashi 2022: विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; फुलांची उधळण करत जळगावकरांचा लाडक्या बाप्पाला निरोप
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 2:02 PM

जळगाव : आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो. आज राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पहायला मिळत आहे. जळगावकर (Jalgaon) देखील आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. जळगावात सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत जळगाव शहरातील सुमारे 65 सार्वजनिक गणपती मंडळे सहभागी झाले आहेत. या मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. त्यानंतर शहरातील विविध गणपती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

शहरात चोख पोलीस बंदोबस्त

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीसबंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. सुमारे 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचूती घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

65  मंडळांचा सहभाग

जळगावात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत शहरातील 65 सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळे सहभागी झाली आहेत. विसर्जन मिरवणुकीत सर्वात पुढे महापालिकेचा मानाचा गणपती आहे. त्यानंतर इतर गणेश मंडळाचे गणपती या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

रात्री बारा वाजेपर्यंत विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही मिरवणूक 12 ते 14 तास चालेल असा अंदाज आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मिरवणूक निर्बंधमुक्त वातावरणात पार पडत असल्याने भक्तांमध्ये उत्साह आहे. भक्तांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरल्याचे पहायला मिळत आहे. फुलांची उधळण करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.