Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार

राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. (Professors salary will be paid during 2013 strike Period said Uday Samant) 

उदय सामंतांची प्राध्यापकांसाठी मोठी घोषणा, तब्बल 7 वर्षानंतर संप काळातील वेतन मिळणार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 1:29 PM

नागपूर : तब्बल सात वर्षानंतर राज्यातील प्राध्यापकांना संप काळातील वेतन मिळणार आहे. राज्यातील प्राध्यपकांनी 2013 मध्ये केलेल्या 71 दिवसांच्या संप काळातील वेतन देण्यात येणार आहे. नुकतंच उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतचा निर्णय घेतला आहे. (Professors salary will be paid during 2013 strike Period said Uday Samant)

“राज्यातील प्राध्यापकांचे दिनांक 4 फेब्रुवारी 2013 ते दिनांक 10 मे 2013 या 71 दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील 12515 अध्यापकांना होणार असून एकूण 191.81 कोटी थकीत वेतन त्यांना मिळणार आहे,” असे ट्वीट उदय सामंत यांनी केले आहे.

नेमकं प्रकरणं काय?

राज्यातील प्राध्यापकांनी वेतन वाढ आणि इतर प्रलंबित प्रश्नांसाठी 4 फेब्रुवारी 2013 पासून बेमुदत संप सुरू केला होता. यानंतर 10 मे 2013 रोजी सरकार आणि प्राध्यापक संघटना यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने हा संप तसाच सुरु होता. हा संप संपल्यानंतर राज्य सरकारने आंदोलन काळातील प्राध्यापकांचा पगार दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

त्यानंतर प्राध्यापक संघटनांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेविरोधात उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातही प्राध्यापकांच्या बाजूने निकाल लागला. यामध्ये प्राध्यापकांना त्यांचा 71 दिवसांचा पगार द्यावा. तसेच या रकमेवर 8 टक्के व्याज द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

या आदेशानुसार प्राध्यापकांना संप काळातील 71 दिवसाचा पगार दिला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.(Professors salary will be paid during 2013 strike Period said Uday Samant)

संबंधित बातम्या : 

‘फॉरेन्सिक तज्ज्ञ नसल्यानं 1 लाख पुराव्यांचे नमुने तपासणीविना पडून’, बेरोजगार तरुणांची भरतीची मागणी

सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? फडणवीसांच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.