Ambernath Tourist Ban : अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर प्रवेशबंदी, 4 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू

4 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांत माने यांनी दिली आहे.

Ambernath Tourist Ban : अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर प्रवेशबंदी, 4 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू
अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर प्रवेशबंदीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 9:10 PM

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश (Prohibition Order) लागू करण्यात आले आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना (Incident) टाळण्यासाठी 4 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत लागू राहतील, अशी माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली अशी जवळपास सात ते आठ पर्यटन क्षेत्र (Tourist Place) आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकसाठी येत असतात. मात्र इथं आल्यानंतर पाण्याचा अंदाज न येणं, मद्यपान करून पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेकांचे अपघात होतात.

पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई

पावसाळ्यात होणारे अपघात पाहता यंदाच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 4 जुलै ते 31 ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या 3 किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांत माने यांनी दिली आहे.

मनाई आदेशामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार

अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या या पर्यटन क्षेत्रांवर पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यानं या पर्यटकांसाठी चहा, नाश्त्याची दुकानं लावून स्थानिकांना मोठा रोजगार मिळत असतो. मात्र या मनाई आदेशामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे. मात्र पर्यटकांचा अतिउत्साह आणि उन्माद पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं मत देखील दुसरीकडे व्यक्त होतंय. (Prohibition order imposed on tourist areas in Ambernath taluka from 4th July to 31st August)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.