Nagpur | 8 महिन्यांपासून वारांगनांचा व्यवसाय बंद, Jwala Dhote यांच्या नेतृत्वात आंदोलन

Nagpur | 8 महिन्यांपासून वारांगनांचा व्यवसाय बंद, Jwala Dhote यांच्या नेतृत्वात आंदोलन

| Updated on: Mar 08, 2022 | 4:46 PM

ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas aghadi) घराचा आहेर देत सरकार आणि गृहमंत्री वारांगनांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.

ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas aghadi) घराचा आहेर देत सरकार आणि गृहमंत्री वारांगनांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले असून वारांगना माहिलांवर अन्याय केला जात आहे, एकीकडे पोलीस आयुक्त एका महिन्यात एकही खून झाला नाही म्हणून मिरवत आहे, पण दुसरीकडे मात्र एका मुलीवर दहा दहा जणांनी बलात्काराच्या घटना होत आहे, याला जबाबदार पोलीस आयुक्त आहेत. गेल्या 9 महिन्यांपासून वारंगनांचा व्यवसाय बंद आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या वारांगनांवर अन्याय होत आहे. मात्र याकडे महाविकास आघाडी सरकारसुद्धा लक्ष देत नाही. आमच्या पक्षाचे गृहमंत्रीसुद्धा लक्ष देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. वारंगनांचा व्यवसाय बंद असल्याने आता शहरात बलात्काराच्या घटना वाढत आहेत. या बलात्कार करणाऱ्या नाराधमांनी चांगल्या घरातील महिलांवर अत्याचार करू नये, असे आवाहन वारांगना महिला करत असल्याचेही ज्वाला धोटे यांनी सांगितले.