IAS, IPS अधिकाऱ्यांनो तुम्हाला लाखोंचा पगार देतो…आपचं आंदोलन आणि इशारा चर्चेचा विषय…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होऊ पाहत असलेली आम आदमी पार्टीने शहरातील टोइंग मुद्दा हाती घेत शहरात निदर्शने केली आहे.

IAS, IPS अधिकाऱ्यांनो तुम्हाला लाखोंचा पगार देतो...आपचं आंदोलन आणि इशारा चर्चेचा विषय...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 12:40 PM

नाशिक : आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनो आम्ही तुम्हाला लाखोंचे पगार देतो आम्हाला आमचे पार्किंगचे भूखंड परत द्या, ज्यांनी भूखंडे गिळले त्यांच्यावर कारवाई करा. अगोदर पार्किंगची जागा द्या आणि मगच वाहनांची टोइंग करा अशी मागणी करत नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या वतिने आंदोलन करण्यात आले. आपचे नेते जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून आंदोलनाच्या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. टोइंगच्या नावाखाली सुरू असलेली माफियागिरीचा आरोप करत आम आदमीच्या वतिने करण्यात आला इतकंच काय तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी टोइंगचे ठेकेदार काम करतात आणि नाशिककरांना वेठीस धरतात असाही आरोप केला आहे. एकूणच नाशिक शहरात सुरुवातीपासूनच वादात राहिलेली टोइंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टोइंग करण्याच्या प्रक्रियेवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहे. त्यातच टोइंग हे बेकायदेशीर असल्याचा देखील आरोप केला जात असल्याने आम आदमी पार्टीने कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय होऊ पाहत असलेली आम आदमी पार्टीने शहरातील टोइंग मुद्दा हाती घेत शहरात निदर्शने केली आहे.

टोइंगमुले अनेक वाहनधारक त्रस्त आहे, रस्त्याची अडवणूक झाली असेल किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत असेल तर टोइंग करणे योग्य आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र, दिसेल ते वाहन उचलून टोइंग करणे आणि आर्थिक लूट करणे, ही माफियागिरी सहन केली जाणार नाही असेही आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी म्हंटले आहे.

सुरुवातीपासूनच टोइंगचा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे, त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने हा मुद्दा हाती घेऊन नाशिककरांच्या संतापाला मोकळी वाट करून दिली आहे.

अधिकारीही याबाबत योग्य ती कारवाई करत नाही, पार्किंग न देता ही कारवाई योग्य नसल्याने पार्किंगचे भूखंड कोणी चोरले त्याची चौकशी करा अशीही मागणी केली जात आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.