Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन, अध्यक्ष यांनी दिला अखेरचा इशारा

या खुर्चीवर बसल्यानंतर कोणत्याही सदस्याच्या प्रश्नाला न्याय देण्याचीच माझी भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करावे असे मी सांगत नाही. पण, आंदोलन करायचे असेल तर पायऱ्यांवर करावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन, अध्यक्ष यांनी दिला अखेरचा इशारा
MLA NITIN DESHMUKH Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 6:56 PM

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु केले आहे. आतापर्यंत विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून अनेक आमदारांनी आंदोलने केली आहेत. परंतु, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून कोणत्याही आमदाराने आंदोलन केले नाही. मात्र, अशी प्रथा पडू नये अशी काळजी अध्यक्षांनी घ्यावी अशी विनंती मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही नाराजी व्यक्त केली. वास्तविक या खुर्चीवर बसल्यानंतर कोणत्याही सदस्याच्या प्रश्नाला न्याय देण्याचीच माझी भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन करावे असे मी सांगत नाही. पण, आंदोलन करायचे असेल तर पायऱ्यांवर करावे असे सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर अद्याप निर्णय न झाल्याने नितीन देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन न करता नितीन देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु केले.

हे सुद्धा वाचा

त्यावरून विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरत अध्यक्षांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत सरकारला निवेदन करण्यास सांगितले. त्यानुसार मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्री महोदय आणि अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार त्यांना भेटायला गेलो. त्यांचे निवेदन घेतले. आम्ही 2004 पासून इथे आहोत. अनेक आमदारांची आंदोलने पाहिली. पण, आजपर्यंत कुठल्याही सन्माननीय सदस्यांनी असे धरणे आंदोलन धरले नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वापर आंदोलन करण्यासाठी होणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विधिमंडळाच्या परंपरेला न शोभणारे आहे. येथी परंपरा आणि प्रथा खंडित करणारे आहे. पुतळ्याजवळ आंदोलन करणाऱ्या आणि त्या जागेचा वापर करून इथल्या प्रथा परंपरा मोडणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी विनंती करतो, असे मंत्री देसाई म्हणाले.

त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही निवेदने आली त्यावरून स्थगिती दिली. पण ती कायम स्थगिती नाही. निवेदनातील वस्तुस्थिती पाहून ते पुढील निर्णय देणार आहेत. तशी कल्पना सदस्यांना पण देण्यात आली आहे असे असताना त्यांनी आंदोलन सुरु केले.

आत्तापर्यंतच्या आपल्या सभागृहातल्या किंवा विधिमंडळाची जी परंपरा आहे. अगदी नियमात लिहिलेले नसले तरी परंपरेनुसार सभागृहाबाहेर विधानभवन आवारात आंदोलन करायचे असेल तर ते आपण पायऱ्यांवर करतो. छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचे, देशाचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याखाली जाऊन राजकीय आंदोलन करणे मला योग्य वाटत नाही.

सदस्यांनी आंदोलन करावे असे या खुर्चीवर बसून मी तरी सांगणार नाही. पण, त्यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांनी पायऱ्यांवर करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन आंदोलन करण्याची प्रथा पाडणे योग्य नाही. त्यामुळे तशी समज समस्यांना देईन. त्यातूनही त्यांनी योग्य कारवाई केली नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा अन्य कुठली वेगळी कारवाई असो त्या संदर्भातला विचार करू, असे अध्यक्ष यांनी स्पष्ट केले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.