Pu La Deshpande | पु.ल. देशपांडेंची 101 वी जयंती, डूडल साकारत गुगलची खास मानवंदना
मुंबईत राहणाऱ्या समीर कुलावूर या कलाकाराने हे खास डुडल तयार केले आहे. (Pu La Deshpande 101st birth anniversary Google design Doodle)

मुंबई : साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची गुगलने खास दखल घेतली आहे. पु.ल. देशपांडे यांची आज 101 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने गुगलने एक डूडल साकारत त्यांना मानवंदना दिली आहे. मुंबईत राहणाऱ्या समीर कुलावूर या कलाकाराने हे खास डुडल तयार केले आहे. (Pu La Deshpande 101st birth anniversary Google design Doodle)
पुलंच्या जीवन आणि कार्याची संपूर्ण माहिती या डूडलच्या निमित्ताने मिळत आहे. गुगलने साकारलेल्या या डूडलमध्ये पुलं हे हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे विविध रंगांची उधळणही केल्याचं दिसत आहे.
पुलंचे व्यक्तीमत्त्व उलगडणाऱ्या या ऑनलाईन प्रदर्शनासाठी आशुतोष आणि दिनेश ठाकूर यांनी विशेष सहकार्य केले आहे. त्यामुळे पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
गुगलने केलेल्या दालनामध्ये पुलंच्या बहुआयामी योगदानाचा वेध घेण्यात आला आहे. यात दुर्मिळ छायाचित्रे, ऑडिओ टेपचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पुलंचा जन्म आणि त्यांचे आयुष्य, लेखन, चित्रपट, नाटकांची पोस्टर्सही यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
पु. ल. देशपांडे यांची माहिती
पु. ल. देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला होता. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे त्यांचे संपूर्ण नाव. त्यांच्या कुटुंबात साहित्यिक वातावरण होते. संगीत, लेखन, चित्रपट, नाटक आणि साहित्य इत्यादी क्षेत्रात त्यांचे नाव नेहमीच चर्चेत असते.
पु.ल. देशपांडे यांचे कुटुंब सुरुवातीला ग्रँट रोड या परिसरात राहत होते. त्यानंतर आठ वर्षे ते मुंबईतील सारस्वत बाग कॉलनीमध्ये राहायचे. यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब हे विलेपार्ले या परिसरात स्थायिक झाले.
गेल्यावर्षी पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा ‘भाई’ नावाचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. पुलंना प्रेमाने ‘भाई’ म्हटलं जायचं. भाई’ या आदरार्थी नावाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले ‘पुलं’ म्हणजे एक मिष्किल व्यक्तिमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशाह असेही म्हणतात. (Pu La Deshpande 101st birth anniversary Google design Doodle)
संबंधित बातम्या :
ISRO चं ऐतिहासिक यश, 10 उपग्रहांसह PSLV-C49 क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण
IRCTC ने नियम बदलले! तिकीट बुकिंग करण्यासाठी आता नवे नियम, जाणून घ्या…