पोलीस आयुक्त आणि न्यायालयात दो आँखे बारह हाथ… संजय राऊत असं का म्हणाले ?

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरण आता चांगलचं तापलं असून त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर ताशेरे ओढलेत. पुणे पोलिस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस आयुक्त आणि न्यायालयात दो आँखे बारह हाथ... संजय राऊत असं का म्हणाले ?
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 12:32 PM

पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरण आता चांगलचं तापलं असून त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. शनिवारी मध्यरात्री एका नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरघाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली. यामध्ये बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिकांनी त्या मुलाला आणि त्याच्या मित्राला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १४ तासांतच त्या मुलाला जामीन देण्यात आला. यामुळे संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापलं आहे.  आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही या मुद्यावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर ताशेरे ओढलेत. पुणे पोलिस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का ?, हा सर्व पैशाचा खेळ आहे, अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले संजय राऊत ?

पुण्यातील पोलीस आयुक्ता यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली. पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करतात ? त्या बिल्डरचा मुलगा बारमध्ये दारू पिताना दिसतोय त्याचे व्हिडिओ देखील बाहेर आले आहेत. पण त्याचा मेडिकल रिपोर्ट निगेटीव्ह आलाय, तो खोटा आहे, असा आरोप राऊत यांनी केला. त्या मुलाच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे असे टीकास्त्र राऊत यांनी सोडलं. पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का हा सर्व पैशाचा खेळ आहे. हा प्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे सर्व भ्रष्ट पोलीस आयुक्त आणि एक आमदाराने केलं आहे. पुण्यातील जनतेने या संदर्भात पोलीस आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे असे राऊत म्हणाले.

दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी – वड्डेटीवार यांची मागणी

दरम्यान या अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पीत असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली ? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली ? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का ? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे, असा आरोप करण्यात येत आहे. आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली – रवींद्र धंगेकरांचे ट्विट चर्चेत

दरम्यान काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत यासंदर्भातील एक ट्विट केलं. अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र पबमध्ये दारू पित असल्याचा तो व्हिडीओ धंगेकरांनी ट्विट केला होता.’ व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली ,मग मुलाची Alcohol test निगेटिव्ह आली. माणूस म्हणवण्याच्या देखील लायकीचे नाहीत ही लोकं.’ असं लिहीत धंगेकरांनी पबमधला व्हिडीओ शेअर केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.