पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यावरुन पुन्हा संभ्रम; अजितदादांकडून आजची तारीख, तर सामंत म्हणतात, आताच नाही!

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांमधील संग्रमावस्था आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. कारण, महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भांत अधिकृत पत्र आमच्या विभागानं दिलं नाही, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे.

पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यावरुन पुन्हा संभ्रम; अजितदादांकडून आजची तारीख, तर सामंत म्हणतात, आताच नाही!
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 2:52 PM

रत्नागिरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालये 12 ऑक्टोबरपासून सुरु होतील, असं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 8 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांमधील संग्रमावस्था आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे. कारण, महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भांत अधिकृत पत्र आमच्या विभागानं दिलं नाही, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे. (There is no order yet to start colleges in Pune from today- Uday Samant)

पुण्यातील महाविद्यालये करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूतोवाच केलं होतं. अजितदादांनी आमच्या विभागालाही सूचना केली होती की महाविद्यालये सुरु झाली पाहिजेत. मात्र, महाविद्यालये सुरु करण्याबाबत अधिकृत पत्र आमच्या विभागानं दिलं नाही, असं सामंत म्हणाले. काही स्वायत्त संस्थांकडून महाविद्यालये सुरु करण्याचा प्रयत्न झाला. अशा महाविद्यालयांना मंत्री उदय सामंत यांनी विनंती केली आहे की, सरकारचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्वाची आहे. राज्यातील सर्व कुलगुरुंशी बोलून उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असं सामंत म्हणाले.

‘पुण्यातील महाविद्यालय गैरसमजातून सुरु झाली’

त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी मी स्वत: बोलणार आहे. महाविद्यालये सुरु करण्याची तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. पुणे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात आम्ही महाविद्यालये सुरु करण्याची तयारी करतो आहोत, अशीच माहिती आहे. कुलगुरूंसोबत आज माझी बैठक झाली. या बैठकीचा अहवाल तातडीने मुख्यमंत्री पाठवण्यात येईल. आज जी महाविद्यालय सुरू झाली त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. पण समन्वय नसल्यामुळे, संचालकांशी न बोलल्यामुळे महाविद्यालय सुरू झाली. पुण्यातील महाविद्यालय गैरसमजातून सुरु झाली असल्याचं उदय सामंत यांनी मान्य केलं.

पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली

पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी लोणावळ्यात पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोना निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता बंदी उठल्याने त्यांना गुलाबी थंडीचा आनंद अगदी निर्धास्तपणे लुटता येईल.

पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड

मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावर असल्याने पावसाळ्यात पुण्यातील अनेक पर्यटनस्थळांवर गर्दी होते. मात्र, यंदा कोरोनामुळे याठिकाणी निर्बंध लादण्यात आले होते. भुशी डॅम, टायगर पॉईंट व लायन्स पॉईंटच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांना माघारी परतावे लागले होते.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील निर्बंध शिथील न होऊनही अनेकजण लोणावळ्यात फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलिसांनी पर्यटकांना चांगलाच दणका दिला होता. 31 जुलै आणि 1 ऑगस्टला वीकेंड असल्याने पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी 334 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या माध्यमातून शासनाला 1 लाख 75 हजाराचा महसूल मिळाला होता.

इतर बातम्या :

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढणार! राणा म्हणतात, ‘मला कुठलीही नोटीस नाही’

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

There is no order yet to start colleges in Pune from today – Uday Samant

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.