Pune Corona Update : पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमध्ये चर्चा

पुण्यातील व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून आपली दुकाने संध्याकाळपर्यंत सुरु ठेवत सरकारचे आदेश धुडकावून लावले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती मिळत आहे.

Pune Corona Update : पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमध्ये चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 7:42 PM

पुणे : राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारनं कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. मात्र, पुण्यात लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गानं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली होती. पुण्यातील दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून आपली दुकाने संध्याकाळपर्यंत सुरु ठेवत सरकारचे आदेश धुडकावून लावले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती मिळत आहे. (state government intends to provide relief to the traders in Pune)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील दुकाने संध्याकाळी 8 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अजित पवार निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक – दोन दिवसात पुण्यातील व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे.

पुण्यातील व्यापाऱ्यांची आक्रमक भूमिका कायम

पुण्यात दुकानांसाठी सकाळी 7 ते दुपारी 4 ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, व्यापारासाठी ही वेळ योग्य नाही. आम्हाला 7 ते 4 ऐवजी 11 ते 8 अशी वेळ देण्यात यावी. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असतानाही निर्णय घेतला जात नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार, अशी आक्रमक भूमिका फत्तेचंद रांका यांनी घेतली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात व्यापाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुपारी 4 पर्यंतची वेळ दिलेली असताना पुण्यातील व्यापारी संध्याकाळपर्यंत दुकानं सुरु ठेवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महापौरांचा आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

दरम्यान, पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. पुणे शहरात शिथिलता देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुणे महापालिकेकडे प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रस्ताव वाठवला आहे. पुढील कोरोना आढावा बैठकीत पुण्यातील शिथिलतेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही काल पुण्यातील कोरोना निर्बंधांवरुन राज्य सरकारवर टीका केली होती. 4 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असताना पुणे का सुरु झालं नाही कळत नाही? असा सवाल त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं

काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, पुणे मेट्रोवरुन अमृता फडणवीस यांची टीका

state government intends to provide relief to the traders in Pune

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.