पुण्याच्या मोठमोठ्या सोसायटीत कोरोनाचा प्रकोप, दोन आठवड्यात 121 कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊनची टांगती तलवार?

शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत. | Pune Corona Updates

पुण्याच्या मोठमोठ्या सोसायटीत कोरोनाचा प्रकोप, दोन आठवड्यात 121 कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊनची टांगती तलवार?
पुणे महापालिका
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:27 AM

पुणे : शहरात कोरोनाने (pune Corona Updates) पुन्हा एकदा हैदोस सुरु केलाय. गेल्या काही दिवसांत सातत्याने शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतीय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण जर असेच वाढत राहिले तर पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Pune Corona Updates pune city Containment zone Lockdown update)

कोरोना रुग्णांत वाढ, लॉकडाऊनची टांगती तलवार?

महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहरातील मोठ्या सोसायट्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शहरात अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 121 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र प्रशासनाला घोषीत करावी लागली आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण जर असेच वाढत राहिले तर पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण

पुणे शहरातील मोठ्या आणि महत्त्वाच्या सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामध्ये जवळपास 95 टक्के मोठ्या सोसायट्या तसेच इमारती आहेत. कोरोना रुग्णवाढ झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सोसायट्यांमध्ये सर्वाधिक असल्याचं देखील समोर आलंय.

शहरातील सर्वाधिक 19 प्रतिबंधित क्षेत्र औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. त्यातही प्रामुख्याने औंध-बाणेर, हडपसर, कोथरूड तसेच सिंहगड रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ असल्याचं समोर आलंय.

पुणे पालिका प्रशासन अॅक्टिव्ह मोडवर

पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक नियम जाहीर करण्यात आलेत. त्यानुसार जे नागरिक नियम पाळत नाहीत, त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई देखील करण्यात येत आहे. तसंच कोरोनाला आळा घालण्यासाठी महापालिकेडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा क्वारंन्टाईन सेंटर सुरु करण्यात आलंय तसंच लसीकरणाची मोहिमही जोरदारपणे राबवण्यात येत आहे.

क्षेत्रीय कार्यालय निहाय प्रतिबंधित क्षेत्र…

औंध-बाणेर – 19, कसबा- विश्रामबाग – 9, कोंढवा- येवलेवाडी – 11 , कोथरूड- बावधन -14, ढोले-पाटील रस्ता – 2, धनकवडी-सहकारनगर – 13, नगर रस्ता- 3 , बिबवेवाडी 10, वानवडी- रामटेकडी – 6, वारजे-कर्वेनगर – 4, शिवाजीनगर- घोले रस्ता – 9, सिंहगड रस्ता – 9, हडपसर मुंढवा 7

पुणे जिल्ह्यातली कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव

पुणे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावांची संख्या वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी केवळ 50 गावे हॉटस्पॉट होती, यामध्ये आता 17 गावांची भर पडलीय. जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या आता 67 गावांवर जाऊन पोहोचली आहे.

कोरोनाचा हैदोस, महापालिकेचे नवे आदेश काय?

पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.

लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) 50 टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा.

(Pune Corona Updates pune city Containment zone Lockdown update)

हे ही वाचा :

वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.