Coronavirus: आनंदाची बातमी! पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, निर्बंध शिथील होणार
सध्याच्या घडीला पुणे महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आहे. | Pune Coronavirus
पुणे: कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध काही अंशी शिथील होणार आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने (Shops) आता सकाळी 7 ते दुपारी दोनपर्यंत उघडी ठेवली जातील. तसेच आणखी काही सेवांना सवलत मिळण्याची शक्यता आहे. (Coronavirus situation in Pune)
सध्याच्या घडीला पुणे महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या खाली आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 60 टक्के ऑक्सिजन बेडस् रिकामे आहेत. अशा ठिकाणी प्रशासनाकडून निर्बंधांमध्ये काही सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा पुणे शहराला मिळणार आहे.
लहान मुलांसाठी 7939 बेडस्
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आतापासूनच तयारी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लहान मुलांसाठी 7939 बेडस् तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात केवळ लहान मुलांसाठी तब्बल 7939 बेडची तयारी करून ठेवली आहे. यामध्ये 528 आयसीयू बेड असून 183 व्हेंटिलेटर्स बेडचा समावेश आहे.
तसेच पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्येही लहान मुलांच्या उपचारांची सर्व तयारी सुरू आहे. यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्ससह आवश्यक डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती देखील करण्यात येत आहे.
पुण्यातील 7.5 लाख नागरिकांवर कारवाई
आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या तब्बल साडेसात लाख पुणेकरांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून पुणे पोलिसांनी 32 कोटी 22 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांकडून 500 रुपयांचा दंड केला जातोय. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात आतापर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे मनपा आणि पुणे पोलिसांनी 22 कोटीचा दंड वसूल केला आहे.
संबंधित बातम्या:
लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टीचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
(Coronavirus situation in Pune)