Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona ) यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनासंबंधी माहिती दिली. 

खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 5:26 PM

पुणे : पुण्यातील एकूण 17 जण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या संपर्कातील 43 जणांवर आरोग्य विभागाचं लक्ष आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona ) यांनी दिली.  पुणे विभागातील कोरोना विषाणून बाधित आणि संशयितांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोज संध्याकाळी 4 वाजता जिल्हा प्रशासन कोरोनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हैसेकर म्हणाले. (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona )

गर्दी टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना कारवाईचे सर्व अधिकार दिले आहेत.   मीडिया आणि सोशल मीडियाला विनंती आहे की रुग्णांची ओळख दाखवू नका, असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं.

हात कसे धुवावे, खोकावं कसं?

यावेळी आयुक्तांनी हात कसे धुवावे याचं एकप्रकार प्रात्यक्षिक दाखवलं. शिवाय खोकताना रुमाल कसा पकडावा, रुमाल नसेल तर हाताच्या बाह्याजवळ तोंड नेऊन कसं खोकावं हे दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. साबणाने स्वछ हात धुणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.  प्रवास अत्यावश्यक असेल तरच करा. गर्दी टाळा, असा सल्ला म्हैसेकर यांनी दिला.

हात धुण्याचं प्रात्यक्षिक

साबणाने दर चार तासांनी हात स्वच्छ धुवावे. हात धुताना केवळ तळव्यांना साबण लावू नका, तर बोटांच्या मधील जागा, बोटांची अग्र यांना व्यवस्थित साबण लावून किमान 20 सेकंद हात चोळून स्वच्छ धुवा. हे 20 सेकंद देणं हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे.

जेव्हा एखादा रुग्ण खोकतो किंवा शिंकतो तेव्हाच हे विषाणू हवेतून येतात, त्याशिवाय हा विषाणू हवेतून पसरत नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपले हात अन्य वस्तूंना लागल्याने आणि तेच हात आपण तोंड, नाक, डोळ्यांना लावल्यास, ते विषाणू शरिरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे, असं आयुक्त म्हणाले.

खोकताना रुमालाची घडी सोडून तो तोंडावर पकडून खोका. जर रुमाल नसेल तर कोपरात हात वाकवून, बाह्या समोर घेऊन खोकावं, जेणेकरुन समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याची बाधा पोहोचणार नाही, असा सल्ला आयुक्तांनी दिला.

सरकारी रुग्णालयाव्यतिरिक्त खासगी रुग्णालयात 200 बेड्स तयार करण्यात आले आहेत. 5 कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  पुणे विद्यापीठाच्या परीक्षासंदर्भात बैठक घेणार आहे, परीक्षा पुढे ढकलायच्या की नाही त्यावर विद्यापीठाशी चर्चा करु, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.
VIDEO

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.