चप्पल नेमकी कुणी भिरकावली? गोपीचंद पडळकर यांचा कुणावर निशाणा?; चप्पल फेकीनंतर ठिकठिकाणी आंदोलनं

| Updated on: Dec 10, 2023 | 11:42 AM

Gopichand Padalkar on Chappalfek in Indapur OBC Melava : चप्पल फेकीच्या प्रकारानंतर ठिकठिकाणी पडसाद पाहायला मिळत आहेत. या सगळ्या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा रोख कुणाकडे आहे? गोपीचंद पडळकर या सगळ्या प्रकरणावर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

चप्पल नेमकी कुणी भिरकावली? गोपीचंद पडळकर यांचा कुणावर निशाणा?; चप्पल फेकीनंतर ठिकठिकाणी आंदोलनं
gopichand padalkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 10 डिसेंबर 2023 : पुण्यातील इंदापूरमध्ये काल ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. या घटनेचे आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. धनगर समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. जालन्यात धनगर समाजाकडून रस्त्यावर टायर जाळत या चप्पलफेकीचा निषेध करण्यात आला. तर गोपीचंद पडळकर यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

जालन्यात धनगर समाजाचं आंदोलन

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ जालन्यातील शिरनेरमधील अंबड पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अंबड पैठण महामार्गावरील शिरनेर इथं धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत टायर जाळून निषेध केला सकाळी 8 वा झालेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. गोपीचंद पडळकर यांना टार्गेट केल्यास धनगर समाज शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी यावेळी दिला आहे.

गोपीचंद पडळकर पडळकर काय म्हणाले?

ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाला पाहिजे. या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाजी करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली… खरोखर मला यांची कीव वाटते, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

रोख कुणाकडे?

आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे. गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात. तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणं नसून समाजात अशांतता पसरवणं आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे? हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ओबीसी बांधवांना आवाहन काय?

काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिलं आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या 11 तारखेला आपल्याला नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे.त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा, असं आवाहनही पडळकर यांनी केलं.