जय शिवराय म्हणत भाषणाला सुरुवात अन् इतिहासाचा दाखला देत आरक्षणाची मागणी; पुण्यात मनोज जरांगे यांचं दमदार भाषण
Manoj Jarange Patil Full Speech on Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी जय शिवराय म्हणत भाषणाला सुरुवात केली अन् इतिहासाचा दाखला देत आरक्षणाची मागणी केली. पुण्यातील खराडीत मनोज जरांगे पाटील यांनी दमदार भाषण केलं आहे. पाहा त्याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...
अभिजीत पोते, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी- खराडी, पुणे | 20 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात सभा होत आहे. भर उन्हात बसलेल्या मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करत आहेत. जय शिवराय म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे. तसंच इतिहासाचा दाखला देत त्यांनी आरक्षणाची मागणी केलीय. खराडी आणि पुणे शहरातील माझ्या तमाम मराठा बांधवाना माझ जय शिवराय… मराठा आरक्षणची लढाई खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी टोकाची झुंज दिली आहे. आम्ही सगळ्यांच्या कल्याणासाठी लढत राहिलो. पण आता आरक्षण मिळणं गरजेचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही कधी जातीवाद केला नाही”
आम्ही कधी जातीवाद केला नाही. सगळ्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात फिरवण्याचा काम मराठ्यांनी केलं. माझ्या बांधवांनी कधीच कुणाची जात शोधली नाही. प्रत्येकाला आम्ही आधार दिला. माझ्या बापजद्यांनी अनेकांना दिलं. स्वत: चं लेकरू उघड पडलं पण दुसऱ्याच्या लेकरांना सगळं दिलं. जात ही कधी त्यांनी मानली नाही. माझ्या बापाने लोकांच्या लेकरांच्या डोळ्यातलं पाणी पुसवण्याचं काम केलं. लोकांना माझ्या बापाने पोटभरं दिलं. पण आता आपल्या लेकरांसाठी लढण्याची गरज आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
“आरक्षण आमच्या हक्काचं”
आरक्षण देताना देखील आम्ही कधीच भेदभाव केला नाही. याला जास्त का आणि आम्हाला कमी का असा सवाल कधीच केला नाही. स्वतःच्या हक्कच आरक्षण दुसऱ्याला दिलं. पण घेऊ नका, असं म्हटलं नाही. आरक्षण सागक्यांना देऊ दिलं. सगळ्यांसाठी माझ बांधव उभा राहिला. आम्ही सगळ्या समाजाला सढळं हाताने मदत केली. आम्ही आरक्षण देताना कधीच मागे पुढे बघितलं नाही आणि आजही दुसऱ्यांना मदत करताना आमचा हात मागे पुढे सरकत नाही. माझ्या समाजाचा विश्वास प्रबळ होता. आम्ही देशात कधीच कुणाला कमी पडू दिला नाही. सगळ्या जातीतल्या लोकांना मदत करणारा हा समाज आहे. कुणावर संकट आले तर छातीचा कोट करून आम्ही थांबली. कधीच कुणाला कमी लेखलं नाही. जातीवाद न करण्याचा संस्कार दिला. त्याच पावलावर पाऊल ठेवत आपण पुढे जात आहोत. आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत, असं जरांगे म्हणाले.
“आमची काय चूक?”
75 वर्षात या राज्यात जेवढे पक्ष झाले त्या पक्षातल्या नेत्यांना मोठे करण्याचं काम माझ्या मराठा समाजांना केलं. तिथेही आमच्या बांधवांनी कधी जात बघितली नाही. या नेत्यांना मराठ्यांनी आपलं म्हणून मोठं केलं. मदत लागली तर हा धावून येईल म्हणून याना मोठं केलं. ज्यांना मोठं केलं ते देखील आज लेकराची मदत करायला तयार नाहीत. आमची काय चूक झाली? आम्ही काय पाप केलं? यांच्यावर विश्वास ठेवला आणि यांनीच आपला घात केला, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी म्हणालेत.