Pune Lockdown Update : पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात, दुकानांसाठी नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?
पुणे : मोठ्या गोंधळानंतर अखेर राज्य सरकारनं अनलॉकची नवी नियमावली जाहीर केलीय. राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले आहेत. या 5 टप्प्यानुसार राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार असून, सर्वकाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. […]
पुणे : मोठ्या गोंधळानंतर अखेर राज्य सरकारनं अनलॉकची नवी नियमावली जाहीर केलीय. राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले आहेत. या 5 टप्प्यानुसार राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार असून, सर्वकाही सुरु करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे. (Pune City in third phase of Unlock)
पुण्यात या गोष्टी सुरु राहणार
1. हॉटेल, रेस्टोरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने 2. हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा 3. लोकल – फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी 4. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत 5. खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार ) दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता) 6. क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात 7. चित्रीकरण – बायोबाल , सायंकाळी 5 पर्यंत 8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 9. लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत 10. अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत 11. शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती 12. बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा 13. शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत 14. संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर 15. जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन 16. सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून 17. ई कॉमर्स – नियमित वेळेत 18. मला वाहतूक – नियमित वेळेत
मॉल-सिनेमागृह बंदच राहणार !
पुणे मनपा हद्दीतील मॉल्स आणि सिनेमागृह तूर्त बंदच ठेवण्यात येत असून सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स असे दोन्ही प्रकारातील सिनेमागृह बंद राहतील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 5, 2021
पाच लेव्हल/ पाच टप्पे नेमके कसे आहेत?
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
कोणत्या टप्प्यात किती जिल्हे
- पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे
- दुसर्या टप्प्यात 2 जिल्हे
- तिसरा 15 जिल्हे
- चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे
SBI, HDFC, ICICI : 30 जूनची डेडलाईन लक्षात ठेवा, अन्यथा FD अधिक लाभांश नाही मिळणारhttps://t.co/JZOcDBHGgQ#FD |#SBI |#HDFC |#ICICI |#Offer |#get |#more |#dividend
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
संबंधित बातम्या :
Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार
Pune City in third phase of Unlock