Pune Lockdown Updates : पुण्यात एकाच दिवशी 2500 रुग्ण, महापालिका प्रशासन हादरलं, हे असतील नवे निर्बंध?

पुण्यात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन मुळासकट हादरलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज एका विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे. Pune Lockdown Updates

Pune Lockdown Updates : पुण्यात एकाच दिवशी 2500 रुग्ण, महापालिका प्रशासन हादरलं, हे असतील नवे निर्बंध?
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 10:32 AM

पुणे : पुण्यात कोरोनाचा स्फोट (Pune Corona Update) झालेला पाहायला मिळतोय. काल एकाच दिवसात (बुधवारी) शहरात  2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता महापालिका प्रशासन मुळासकट हादरलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज एका विशेष बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत नवे निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. (Pune Lockdown Updates Corona Update mayor Murlidhar Mohol)

विशेष बैठकीचं आयोजन

काल दिवसभरात वाढलेल्या अडीच हजार रुग्णसंख्येनं प्रशासनानं धास्ती घेतली आहे. आज महापौर, शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोनाला आळा घालण्यासाठी नवे निर्बंध काय असावेत, यावरती चर्चा होणार आहे.  महापौर, महापालिका आयुक्त, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि महापालिकेचे तीन अतिरिक्त आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पुणे शहरात आजपासून कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सकाळी 11 वाजता महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नवे निर्बंध जाहीर करण्यात येणार आहे. तसंच अंमलबजावणीसाठीही कठोर पावलं उचलण्याचे आदेश महापौर देणा आहेत.

नवे निर्बंध काय असणार?

१) नव्या नियमांनुसार दोन्ही वेळी शहरातील उद्याने बंद राहण्याची शक्यता आहे.

२) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (पीएमपी) 50 टक्के क्षमतेनं चालवण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

३) महापालिकेत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना बंदी असेल.

४) कार्यालयात 50 टक्केच उपस्थितीचा नियमही लागू होऊ शकतो.

आता कोणते निर्बंध आहेत?

१) शहरात सध्या नाईट कर्फ्यू लागू आहे.

२) शाळा महाविद्यालये बंद आहेत.

३) गर्दी करण्यास बंदी आहे.

४) एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका 50 टक्के क्षमतेने सुरु आहेत.

पुण्यात सध्या कोरोनाग्रस्तांची स्थिती काय?

पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 573 रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपासून प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 1 हजारांपेक्षांही कमी आहे. बुधवारी पुण्यात दिवसभरात 2587 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त 769 जण कोरोनातून मुक्त झाले.

मृतांचा आकडा 5 हजारांच्या उंबरठ्यावर

पुण्यात कोरोनाचा प्रसार जेवढ्या वेगात वाढतोय; तेवढ्याच प्रमाणात मृतांचा आकडासुद्धा वाढताना दिसतोय. पुण्यात आज (17 मार्च) दिवसभरात 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यातील 5 रुग्ण हे पुण्याच्या बाहेरचे आहेत. मृतांचे प्रमाण असेच राहिले, तर आगामी एक किंवा दोन दिवसांत पुण्यातील मृतांचा आकडा 5000 ची संख्या पार करेल, असे दिसतेय. पुण्यात सध्या 425 बांधितांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा 223797 वर पोहोचला असून सध्या पुण्यात 15032 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे आरोग्य विभागाकडून कोरोनाला थोपवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जात आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसोबतच विलगीरणावर प्रशासनाकडून जोर देण्यात येतोय. सध्या पुणे प्रशासनाने शहर तसेच जिल्ह्यात वेगवेगळे प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत.

(Pune Lockdown Updates Corona Update mayor Murlidhar Mohol)

हे ही वाचा :

Pune corona update | पुण्यात कोरोनाचा स्फोट ! मृतांचा आकडा चिंता वाढवणारा; तब्बल अडीच हजार नव्या रुग्णांची नोंद०

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.