Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यता, अजित पवारांच्या प्रयत्नांना मोठं यश

आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अशातच पुणेकरांना आणखी एक मोठी गूडन्यूज मिळाली आहे. पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -1ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता मिळाली आहे.

Pune Metro : स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पास मान्यता, अजित पवारांच्या प्रयत्नांना मोठं यश
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश! Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:05 PM

मुंबई : आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक (Cabinet Meeting) पार पडली आहे. यात काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. अशातच पुणेकरांना आणखी एक मोठी गूडन्यूज मिळाली आहे. पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -1ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (Swarget To Katraj Metro) पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प (Pune Metro) करण्यास मान्यता मिळाली आहे. पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले आहे. पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबी, 3 स्थानके असलेल्या रु. 3668.04 कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे मेट्रोसंदर्भात निर्णय पुढीलप्रमाणे :-

  1. सदर प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात रु. 450.95 कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर/शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात रु.440.32 कोटी असा एकूण रु. 891.27 कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.
  2. सदर प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून रु.450.95 कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता रु.204.14 कोटी असे एकूण रु.655.09 कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  3. सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रु.300.63 कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.
  4. सदर प्रकल्पाकरिता द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत रु. 1803.79 कोटीचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, सदर कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्यशासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली.
  5. सदर प्रकल्प माहे एप्रिल, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.
  6. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरीकांना तसेच एकंदरीच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.

आज घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल शासनाची माहिती

  1. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
  2. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
  3. मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय. (महसूल विभाग)
  4. तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)
  5. पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता (नगरविकास विभाग)
  6. महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता. (गृह विभाग)
  7. काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण. (गृह विभाग)

Raghunath Kuchik Case Pune: तर शरीर संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करीन, रघुनाथ कुचिक यांनी दबाव टाकत धमकी दिल्याचा पीडीत तरुणीचा आरोप

Pune Firebrigade : आग विझवण्यासाठी जाताना पुण्याच्या हडपसरमध्ये अग्निशामक दलाची गाडी पलटी; एक जवान जखमी

Pune : पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका, डीपी रस्त्यावरची अतिक्रमणं केली जमीनदोस्त

भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.