शेवटी काळजाच तुकडा ना तो… ताटातुट झालेल्या बछडयांना ‘ती’ पुन्हा घेऊन गेली, पाहा VIDEO

बिबट मादी आणि तीच्या तीन पिल्लांची ताटातुट झाली होती. वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून ती भेट घडवून आणण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शेवटी काळजाच तुकडा ना तो... ताटातुट झालेल्या बछडयांना ‘ती’ पुन्हा घेऊन गेली, पाहा VIDEO
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 3:58 PM

पुणे : अलीकडच्या काळामध्ये जंगली प्राणी आणि मानव यांच्यामध्ये फारसं अंतर राहिलेलं नाहीये. शेतातच आता जंगली प्राणी येऊ लागल्याने त्यांच्या उत्पत्तीचं ठिकाण देखील शेतीच असल्याचं अनेकदा पाहायला मिळत आहे. विशेषतः ज्या ठिकाणी दाटीवाटीचे पीक घेतलं जातं जसं की, उसासारखे पीक घेतलं जातं तिथे मादी बिबट बछड्यांना जन्माला घालत असते. मात्र, याच वेळेला वेळेला जर कधी ऊसतोड सुरू झाली तर मादी बिबट आणि बछड्यांमध्ये ताटातूट होत असते. त्यामुळे अनेकदा मादी सैरावैरा धावू लागते. आपल्या बछड्या पासून दूर गेल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाल्याने त्याचा जीव अक्षरशः कासावीस झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे आई आणि पिल्लांची भेट घडून आणण्यासाठी वनविभागाने अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अशीच एक भेट पुण्यातील दौंड तालुक्यात देलवडी येथे शेतकरी संदीप शेंडगे यांच्या शेतात घडवून आणली आहे. उसतोड सुरू असतांना उसतोड कामगारांना तीन बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. त्यांनी तात्काळ याबाबत शेतकरी संदीप शेंडगे यांना कळवली होती.

हे सुद्धा वाचा

शेतकरी संदीप शेंडगे यांनी लागलीच उसतोड थांबवून वन विभागाला याबाबत माहिती दिली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही जवळ कुणीही जाऊ नका मात्र लक्ष राहूद्या असा सल्ला दिला होता. त्यानंतर रेस्क्यू टीमसह वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाले होते.

संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर मादी बिबट आणि बछडयांची भेट घडवून आणण्याचे थरविण्यात आले होते. ईको रेस्क्यू टीम आणि वन विभाग यांच्या समन्वयाने संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली होती.

अंधार पडल्यानंतर मादी बिबट् येण्याची वेळ होते. आपल्या बछडयांची भेट घेण्यासाठी मादी येईल यावेळी रेस्क्यू टीमने बछडयांना क्रेट मध्ये झाकून ठेवले होते. जवळपास एक सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावला होता. म्हणजे संपूर्ण हालचाल त्यामध्ये कैद होईल.

जवळपास तीन पिल्ले होती. मादी बिबट बरोबर अंधार पडल्यावर शोध घेण्यासाठी आलेली असतांना तीच्या निदर्शनास क्रेट दिसले. लागलीच मादीने धाव घेतली आणि बछडे दिसले. त्यात मादीने अलगद क्रेट बाजूला करून पिल्ले उचलून नेले.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मादी आणि बिबट्याची भेट पाहून गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांसह उसतोड कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर मात्र वनविभागसह रेस्क्यू टीमचं सर्वत्र कौतुक केले जात आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.