आनंदाची बातमी! निओ मेट्रोच्या कामाला गती, महामेट्रोकडून आराखडा पालिकेला सादर, कशी असेल नियो मेट्रो?
पुणे ते पिंपरी चिंचवड निओ मेट्रोच्या संदर्भातील आराखडा महा मेट्रोच्या वतीने पालिकेला सादर करण्यात आला असून निओ मेट्रोच्या संदर्भात कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याला नियो मेट्रो कशी असणार याबाबत प्रश्न पडलेला असतांना आता महा मेट्रोकडून पुणे महानगर पालिकेत आराखडा सादर करण्यात आला आहे. पुणे ते पिंपरी चिंचवड पर्यन्त असलेली ही निओ मेट्रो धावणार आहे.पुण्यातील नियो मेट्रोच्या कामाला गती मिळणार असे यावरून दिसून येत आहे. राज्य सरकारकडून देखील या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे नियो मेट्रोच्या संदर्भातील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. याबाबतचा आराखडा महा मेट्रोच्या वतीने पुणे महानगर पालिकेला सादर करण्यात आला आहे. शहरातील 44 किलोमीटरवर ही निओ मेट्रो धावणार आहे.
महा मेट्रोच्या वतीने आराखडा सादर केल्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या वतीने ही पाहणी केली जाणार आहे. त्याकरिता प्राथमिक स्तरावरील चर्चा पार पडली आहे. राज्य शासनाला या प्रकरला यापूर्वीच हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे भूसंपादन करण्याच्या बाबत चर्चा सुरू आहे.
महा मेट्रो आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून एकत्रित पाहणी झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. खरंतर सध्या प्रशासकीय पातळीवरच ही चर्चा सुरू असून निओ मेट्रोच्या बाबत कामाला गती देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू आहे.
खरंतर नाशिक शहरातही अशीच निओ मेट्रो केली जाणार आहे. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात निओ मेट्रो धावणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी महत्वाचा ठरणार असून त्याची प्रक्रिया कशी होते, अंमलबजावणी कशी केली जाते याकडे देशाचे लक्ष लागून आहे.
हजारो कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबविला जात असल्याने केंद्रांचीही मदत घेतली जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा हा भूसंपादनाच्या संदर्भात पार पडणार असून त्यास काही विरोध होतो का? नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो याकडे लक्ष लागून आहे.
पुणे ते पिंपरी चिंचवड निओ मेट्रोसाठी 5 हजर 276 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. पालिकेचाही यामध्ये वाटा असणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची संपूर्ण देशात अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी पुण्यात मेट्रो धावत आहे, केंद्राच्या मदतीने पुण्यात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मेट्रो आणि निओ मेट्रो यामध्ये फारसा काही फरक नसला तरी टायर बेस निओ मेट्रो असण्याची शक्यता अधिक असल्याने खर्च कमी येतो अशी माहिती आहे.