अजित पवार यांना कार्यकर्त्याचा आग्रह, बुलेट चालवा म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला मिश्किल टोला, नेमकं काय घडलं?
एका कार्यकर्त्यांनी दादांना दाखवण्यासाठी चक्क जावा बुलेट आणली होती. त्यावर दादांना राईड मारण्याची आणि बसण्याची विनंती त्या कार्यकर्त्याने केली होती.
पुणे : अजित पवार… महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नाव. नेहमीच कुठल्या ना कुठल्या निमित्ताने अजित पवार चर्चेत असतात. त्यांचा स्वभाव कधी गंमतीशिर असतो तर कधी कठोर. त्यामुळे कार्यकर्ते देखील जरा अजित पवार यांच्या पासून दोन पाऊल मागेच राहतात. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असतांना अजित पवार यांचा आणि कार्यकर्त्यासोबत घडलेला प्रसंग सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अजित पवार हे पुणे दौऱ्यावर असतांना एका कार्यकर्त्याने अजित पवार यांनी जावा बुलेट चालवावी यासाठी आणली होती. कार्यकर्त्याने इतका आग्रह केला की दादा गाडी चालवाच. पण दादांनी काही ऐकले नाही. पण अजित पवार यांनी गाडीची किल्ली घेऊन लावून बघितली पण नंतर जो मिश्किल टोला लगावला त्याची चर्चा होत आहे.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आज सकाळी पुण्यातल्या बारामती हॉस्टेल येथे कार्यकर्ते भेटी साठी आले होते. अनेकांनी फोटोही काढले. तर त्यावेळी अजित पवार यांचा मूड बघून एका कार्यकर्त्याने अजित पवार यांच्याकडे हट्ट धरला.
एका कार्यकर्त्यांनी दादांना दाखवण्यासाठी चक्क जावा बुलेट आणली होती. त्यावर दादांना राईड मारण्याची आणि बसण्याची विनंती त्या कार्यकर्त्याने केली होती. मात्र दादांनी किल्ली लावत जावा बुलेटची माहिती घेतली.
पण दादांनी नवी गाडी पाहून माहिती घेतली पण गाडीला एक सिट कसं ? मग मैत्रीण कुठे बसणार? असा मिश्किल टोला अजित पवारांनी विचारला. त्यानंतर कार्यकर्त्यामध्ये एकच हशा पिकला होता. अजित पवार आणि कार्यकर्त्यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण नाही केला पण अजित दादांनी लगावलेला मिश्किल टोला मात्र चर्चेचा विषय ठरला… #pune #ajitpawar #viralvideo #javabullet pic.twitter.com/fbH9n6XqV1
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 21, 2023
अजित पवार यांनी आपली नवी कोरी जावा बुलेट चालवावी अशी खरंतर कार्यकर्त्याची इच्छा होती. कार्यकर्त्याने त्यासाठी मोठा हट्ट धरला, इतकेच काय दादा हेल्मेट पण आहे, फक्त तुम्ही एकदा गाडी चालवा असे म्हणत हट्ट धरला. मात्र, दादांनी नवीन गाडी असल्याने फक्त माहिती घेतली. मला वाटलं नारळ फोडायला लावतोय का म्हणत दादांनी गाडी पाहिली.
बुलेट गाडीची किंमत किती आहे. ह्या जावा गाडीची किंमत किती आहे? बुलेट आणि जावा गाडीत सीसीत किती फरक आहे? असे सवाल विचारून माहिती घेतली. पण गाडी न चालविणेच अजित पवार यांनी पसंत केले. पण जाता जाता गाडीला एकच सीट का म्हणून अजित पवार यांनी मैत्रीण कुठे बसणार म्हणून सवाल करत मिश्किल टोला लगावल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.