८ वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार, भाजपकडून रवींद्र धंगेकरांचे ट्रोलिंग

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असून निवडणुकांसाठीही या माध्यमाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर निवडणुकीची लढाई सुरू असून भाजपनेही या अस्त्राचा वापर करत रवींद्र धंगेकरांचे ट्रोलिंग सुरू केले आहे.

८ वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार, भाजपकडून रवींद्र धंगेकरांचे ट्रोलिंग
भाजपकडून रवींद्र धंगेकर सोशल मीडियावर ट्रोल
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 10:48 AM

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून बहुतांश पक्षांनी उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे. सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातही सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. आणि आता त्याच पुण्यात निवडणुकीच्या लढाईला सुरूवात झाली आहे. पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला असून भाजपकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे चांगलेच ट्रोलिंग सुरू झाले आहे.

भाजपकडून ट्रोलिंगला सुरूवात

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असून निवडणुकांसाठीही या माध्यमाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर निवडणुकीची लढाई सुरू असून भाजपनेही या अस्त्राचा वापर करत धंगेकरांचे ट्रोलिंग सुरू केले आहे. ‘मविआचा अशिक्षित उमेदवार’, ‘रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास !’ , ‘शिक्षणाचे माहेरघर पुण्याचा उमेदवारच अशिक्षित’ असं लिहीलेला आणि धंगेकरांचा फोटो असलेला मेसेज सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. भाजपने या माध्यमातून धंगेकरांचं शिक्षण काढत त्यांना ट्रोल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.

धंगेकरांकडून चोख प्रत्युत्तर

मात्र भाजपचं हे ट्रोलिंग धंगेकरांनी फारसं मनावर घेतलेलं नाही, उलट त्यांनी या ट्रोलर्सचा पुरेपूर समाचार घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘ ते माझ्या शिक्षणावर घसरलेत म्हणजे ( त्यांना) त्यांचा पराभव दिसतोय’ असे सांगत माझी जनतेत पीएचडी झाली आहे, जनतेनं मला पीएचडीचं प्रमाणपत्र दिलं आहे असा विश्वास धंगेकरांनी व्यक्त केला आहे.

मोदींची हवा असती तर…

एवढंच नव्हे तर धंगेकर यांनी भाजप नेते, पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. तसेच भाजपमध्ये सध्या विविध पक्षांतून सुरू असलेल्या इनकमिंगबद्दल बोलतही त्यांनी त्यावर निशाणा साधला. ‘अबकी बार 400 पार’ असा भारतीय जनता पक्षाचा यंदाच्या निवडणुकीत नारा आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचे आवाहनही भाजपकडून केले जात आहे.

याच मुद्यावरून धंगेकर यांनी टीका केली आहे. ‘हू इज़ धंगेकर’ म्हणून मला ट्रोल केलं जातंय, पण देशात जर मोदींची हवा असती तर भाजपला अजित पवार ,अशोक चव्हाण यांना पक्षात घ्यावं लागलं नसतं असा चिमटा धंगेकर यांनी काढत भाजपवर टीकास्त्र सोडलं. आज ते टू व्हीलर वर फिरतायत , मी मात्र त्यांना रस्त्यावर आणणार , असंही ते म्हणाले. मी जिकडे जाईल तिकडे त्यांना (भाजपला) प्रचार करावा लागतोय, ते माझ्यापुढे जाऊ शकत नाहीत अशी टीकाही धंगेकर यांनी केली.

भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग केल्याचा केला होता आरोप

दरम्यान याच रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असा आरोप केला होता. 16 मार्च रोजी निवडणूक आयोगानेलोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आणि संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली . मात्र त्यानंतर भाजपानेच आचारसंहिता भंग केल्याचा आरोप धंगेकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली.

पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करत पक्ष चिन्हाचा प्रचार केल्याचा काँग्रेसचा आरोप होता. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पक्ष हा जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.