साडे सात वाजल्यानंतर अंबाबाई मला झोपू देत नाही; मग मी…; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत

| Updated on: Jul 22, 2023 | 3:48 PM

Chandrakant Patil on Mahalaxmi Ambabai : झोप, अंबाबाईला दिलेला शब्द अन् 'ते' एक काम; पाहा चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

साडे सात वाजल्यानंतर अंबाबाई मला झोपू देत नाही; मग मी...; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य चर्चेत
Follow us on

पुणे | 22 जुलै 2023 : भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री चंद्रकात पाटील हे आज पुण्यात आहेत. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. तिथे बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. कोल्हापूरची अंबाबाईचा दाखला देत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या झोपेचा किस्सा सांगितला.

मला साडे सात वाजल्यानंतर झोप लागत नाही. अंबाबाई मला झोपू देत नाही. मी एका तर मुलीला मदत करतो. अंबाबाई पण तिचा शब्द पाळते पण माझा शब्द पाळतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आज माझ्या बायकोचा आज वाढदिवस आहे. तिची इच्छा होती मी कोल्हापूरला यावं. मात्र तिला जेव्हा सरहद संस्थेच्या या कार्यक्रमाबद्दल सांगितलं तेव्हा ती म्हटली तू तिकडेच थांब… पुढे, माझी राजकीय रिटायरमेंट कधी आहे माहिती नाही. मात्र बायकोच्या वाढदिवसानिमित्त मी असं ठरवलं आहे की यापुढे सैनिकांसाठी टप्प्या टप्प्याने काम करायचं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

सरहद संस्थेचा हा कार्यक्रम ह्रदयस्पर्शी आहे. या देशाला कुठल्याच दुश्मनाची भीती नाही. संजय नाहर यांचा रचनात्मक संघर्ष करत आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी असते. विद्यार्थी परिषदपासून नहार काम करत आहेत. आतंकवाद्यांकडून मारल्या गेलेल्या मुली आहेत. ज्यांना या लोकांनी त्रास दिला आहे. त्या मुलींना ते इकडे येऊन सरहद्द संस्थेत येतात. त्यांना इथं सुरक्षित राहण्यासाठी वातावारण तयार करतात.अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्या राहण्याच्या ठिकाणची सोय करण्यात आली, असं ते म्हणाले.

त्या कारगिलमधील मुलींनी एका कार्यक्रमात अमित शाहांच्या समोर अभंग पसायदान म्हटलं. तेव्हा अमितभाई शाह भावुक झाले. त्या मुलींना बोलावून तुम्ही काय म्हटलं याबाबत तुम्हाला माहित आहे का? तेव्हा त्या मुलींनी हातवारे करून आपलं मत व्यक्त केलं. त्या मुलीच्या कृतीने देशात सुरू असलेल्या अघटित घटनांना चोख उत्तर होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता. तिला वाटत होतं की मी तिकडे यावं. पण मी तिला पत्र लिहलं की आपल्या दोघांच्या रिटायरमेंट नंतर मिल्ट्रीसाठी काम करायचं आहे. सैन्यासाठी काम करायचं आहे. असं सांगितलं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.