हवामान खात्याचा नवा अंदाज, तापमानातही वाढ होणार; राज्यात कुठे पाऊस पडणार? जाणून घ्या
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट गडद होत असतांना पुणे हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या अंदाजाची स्थिती काय आहेत ती जाणून घ्या.
पुणे : महाराष्ट्रासह देशात यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा किती पाऊस होऊ शकतो याबबात स्कायमेटच्या माध्यमातून अंदाज वर्तविण्यात आले होते. त्यात 94 टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. खरंतर या अमेरिकेतील खाजगी संस्थेने अंदाज वर्तवला होता. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागही लवकरच मान्सून बाबत माहिती सादर करत असतांना दुसरीकडे पुणे हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील सध्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. स्कायमेट यापूर्वी अवकाळी संकट भारतातील काही राज्यात राहील अशी शक्यता वर्तवलेली असतांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यातच आता पुणे हवामान विभागाने जाहीर केलेली माहितीही अधिकची चिंता वाढवणारी बाब आहे.
महाराष्ट्रात आठवडाभरापासून वातावरण मोठे बदल झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी अक्षरशः रेकॉर्डब्रेक तापमान असल्याचे समोर आले होते. तर दुसरीकडे जुन्या जाणत्या माणसांना आठवत नाही इतका वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
असे असतांना पुणे हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढणारी माहिती जाहीर केली आहे. यामध्ये राज्यात दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने वातावरण गरम राहणार आहे.
विदर्भात पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. आणि ते तापमान 43 अंशापर्यन्त जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. कोकणातही पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल महिण्यात कडक्याचे ऊन असणार आहे.
याशिवाय पुणे शहर आणि जिल्ह्यात 40 अंशापर्यन्त तापमान राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यन्त तापमानात अशीच वाढ होणार आहे.
अशी सर्व तापमानाची स्थिती असतांना काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेष करून जिथे तापमानाचा पारा जिथे अधिक असेल तिथे पावसाची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. या सर्व परिस्थितीमध्ये जो शेतकरी नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसात वाचला आहे. त्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
पुण्यातील हवामान विभागाचे अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात झालेल्या वातावरणात मोठा बदल झाला असला तरी दिवसेंदिवस याचा फटका शेती करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. त्यात दोन दिवसांचा वर्तविण्यात आलेला अंदाज बघता येत्या काळात शेतकऱ्यांवरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.