प्रदीप कुरलकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, आंदोलन करत केली मोठी मागणी

बालगंधर्व चौक येथे डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पक्षाच्या वतीने हातात फलक घेत भाजपवर टीका करत मोठी मागणी केली आहे.

प्रदीप कुरलकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, आंदोलन करत केली मोठी मागणी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 11:03 AM

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरूलकर यांना दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी करत अटक केली आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय संस्था असलेल्या संस्थेच्याच संचालकाला पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या संशयावर अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला गोपनीय माहिती दिल्याने एटीएसने कुरुलकर यांच्या भोवतीचा फास आवळला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून चौकशी दरम्यान काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेत पुण्यात आंदोलन सुरू केले आहे.

जेएम रोडवर असलेल्या बालगंधर्व चौक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस हे आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये विविध फलक घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. त्यामध्ये आंदोलकांनी डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे प्रदीप कुरूलकर हे एका संरक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या संस्थेचे संचालक आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला असून कुरुलकर यांना फाशी द्या अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवल्याच्या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने अटकेची कारवाई केली आहे. या प्रकरणात एटीएसने तपासाचा वेग वाढवत कुरुलकर यांच्याकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे.

‘हेच का RSS चे संस्कार’ अशा आशयाचा फलक घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंदोलन केलंय. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला माहिती दिल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पुण्यातील या प्रकारानंतर कठोर कारवाईची मानी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

DRDO ही संस्था भारताच्या संरक्षण खात्याचा अत्यंत महत्वाची संस्था आहे. देशातील प्रमुख असलेल्या संस्थेचा संचालकच थेट पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याने देशाची सुरक्षितीतेचा मुद्दा समोर आला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे आता एटीच्या पथकाच्या कारवाईत कोणती बाब समोर येते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान पुण्यातील हे प्रकरण देशपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच या प्रकरणात आता राजकिय पक्षही मागणी करू लागले आहेत. त्यात राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाने फाशीचीच मागणी केली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये पुढील काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.