शरद पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील नेत्यांनाही दिला सल्ला, पवार नेमकं काय म्हणाले?

सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात नेमकं काय ठरलं याबाबत स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांची महत्वाची प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील नेत्यांनाही दिला सल्ला, पवार नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 11:47 AM

पुणे : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडीत मत भिन्नता असल्याची वारंवार चर्चा होत असते. मग त्यामध्ये कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य नाहीतर शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य, यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया आणि भूमिका बघता महाविकास आघाडीमध्ये मत भिन्नता आहे हे वारंवार स्पष्ट झालं आहे. यावरूनच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईल अशी चर्चा या निमित्ताने वारंवार होत असते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नुकतीच एक बैठक पार पडली होती.

शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. बराच वेळ झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत स्पष्टता नसताना शरद पवार यांनी मात्र यावर भाष्य केले आहे.

आपापल्या पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी महाविकास आघाडी म्हणून त्यातील सर्व पक्षांनी एका विचाराने काम करावं अशा मताशी आमची चर्चा झाली आहे, त्यानुसार काही कार्यक्रम आखले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आमचे ठरले असल्याचे शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली. याबाबत अवघ्या दोन वाक्यात शरद पवार यांनी पुण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे.

खरंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत हे देखील होते.

त्यानंतर माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता उद्धव ठाकरे थेट मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती.

इतकंच काय महाविकास आघाडीत फूट पडेल असंही दबक्या आवाजात बोलले जात होते. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन महाविकास आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर टीका केली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.