राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी, पुणे मनसेच्या वतीनं काय केलं जाणार?

रत्नागिरी येथील जाहीर सभेपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जंगी स्वागत पुणे मनसेच्या वतीने केले जाणार आहे. याबाबत साईनाथ बाबर यांनी माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी, पुणे मनसेच्या वतीनं काय केलं जाणार?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 4:28 PM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे उद्या पुण्यात जंगी स्वागत केले जाणार आहे. या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज ठाकरे यांची खरंतर रत्नागिरी येथे जाहीर सभा आहे. त्यापूर्वी राज ठाकरे उद्या पुण्यात असणार आहे. आणि त्यानंतर राज ठाकरे 6 मे ला रत्नागिरी दौऱ्यावर पुण्यावरून जाणार आहे. याच वेळी त्यांच्या ताफ्यात पुण्यातील 100 वाहनांचा समावेश केला जाणार आहे. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. हा दौरा पंधरा दिवसांपूर्वीच निश्चित झाला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जाहीर सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे पुण्यावरून रत्नागिरीकडे जात असतांना राज ठाकरे यांच्या गाडीच्या पाठीमागे तब्बल पुण्यातील 100 गाड्या असणार आहे.

खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या रत्नागिरी येथील जाहीर सभेची चर्चा सुरू होती. त्याच दरम्यान राज ठाकरे एक दिवस आधी पुण्यात दौऱ्यावर असणार आहे. याच वेळी राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी पुणे मनसेच्या वतीने केली जाणार आहे.

त्यामध्ये पुणे मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या ताफ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या 100 गाड्यांचा समावेश करण्याची तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांचा ताफा मोठ्या प्रमाणात कसा करता येईल यासाठी पुणे मनसेच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून तयारी केली जात होती.

हे सुद्धा वाचा

याबाबत पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलत असतांना ही माहिती दिली आहे. साईनाथ बाबर म्हणाले पुण्यात उद्या मनसे राज ठाकरेंच जंगी स्वागत करणार आहोत. पुणे ते रत्नागिरी 100 गाड्या राज ठाकरेंच्या ताफ्यात असणार आहे.

राज ठाकरेंच्या सभेला गर्दी जमवावी लागत नाही. इतरांच्या सभेला माणस बोलवावी लागतात, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. कोकणात सभेनंतर वातावरण बदलेलं पाहायला मिळेल असेही साईनाथ बाबर यांनी म्हंटलं आहे.

राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आम्हालाही लागली आहे. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा ताफा कसा असणार याकडे संपूर्ण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. त्याच राज ठाकरे हे रत्नागिरी येथील जाहीर सभेत कुणावर हल्लाबोल करतात याची उत्सुकताही पदाधिकाऱ्यांना लागून आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.