Pune News | पुणेकरांसाठी मोठी बातमी, यंदा उन्हाळ्यात पाणीकपातीचं संकट नाही
पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. यंदा उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नाही. कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या डोक्यावरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
पुणे | 24 फेब्रुवारी 2024 : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. यंदा उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार नाही. कालवा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या डोक्यावरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली असून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतशी नागरिकांच्या मनात पाणी कपातीची धास्ती निर्माण होते. महाराष्ट्रात अनेक गावांत, जिल्ह्यात उन्हाळ्यात पाणी टंचाईचं संकट निर्माण होतं आणि त्यामुळेच अनेकवेळा पाणीकपात करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागतो.
कालवा समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार टळली आहे. यंदा पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस झाला होता. मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही
पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार आहेत. पहिलं आवर्तन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. शेतीसाठी ७ टीएमसी पाणी सोडणार . पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे.