Pune Porsche Accident : पुणे हिट अँड रन केस, अमृता फडणवीस संतापल्या, बाल हक्क न्यायालयाचा निषेध करत म्हणाल्या…
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कोणालाही सोडणार अथवा पाठिशी घालण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू असेही स्पष्ट केले.
पुण्यात शनिवारी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत बाईकला जोरदार धडक दिली, त्यामध्ये दोन आयटी प्रोफेशनल्सचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. हिट अँड रन या प्रकरणामुळे फक्त पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातीलही वातावरण तापलं आहे. एवढंच नव्हे तर या अपघातासाठी आणि दोघांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरलेल्या त्या आरोपीला १४ तासांच्या आत जामीन मिळाला. तसेच पोलिस स्टेशनमध्ये असताना त्याला पिझ्झा, बर्गरही देण्यात आल्याचे वृत्त होते. या घटनेनंतर न्यायालयाचा निर्णय आणि पोलिसांकडून कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिक तसेच राजकीय नेतेही भडकले आहेत. विरोधकांनी तर सरकारला धारेवरच धरले.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कोणालाही सोडणार अथवा पाठिशी घालण्यात येणार नसल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करू असेही स्पष्ट केले. त्यानंतरही जनतेत रोष कायम असून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीच या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. संतापलेल्या अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या अल्पवयीन आरोपीला जामीनावर सोडल्याबद्दल त्यांनी ज्युवेनाइनल कोर्टालाही खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दोषी वेदांत अगरवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे! बाल हक्क न्यायालयाची लाज वाटते ! अशा शब्दांत फटकारत अमृता फडणवीस यांनी ट्विट शेअर केले आहे. एकदंरच या घटनेवरून त्यांचा चांगलाच संताप झाल्याचे दिसत असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
My heartfelt condolences to families of Aneesh Awadhiya and Ashwini Kostha . The culprit #VedantAgarwal should be hard punished ! Shame on Juvenile Justice Board !#Pune
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 22, 2024
अनिल देशमुख यांनी फडणवीसांना सुनावले
पुणे हिट अँड रन प्रकरण चांगलेच तापले असून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देशमुख यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना खडेबोल सुनावल. देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबांच्या घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले. दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?, असा सवाल अनिल देशमुख यांनी विचारला.
देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील…
आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी).… pic.twitter.com/mwkltj4mfd
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 22, 2024