Pune Porsche Accident : ओपन टेरेसपासून वेट्रेसपर्यंत 7 कडक बंधनं, नवे नियम काय ?, पब, बार मालकांभोवतीचा फास आवळला

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत आहे. दोन आठवड्यापूर्वी नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून बाईकला धडक दिली व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले.

Pune Porsche Accident :  ओपन टेरेसपासून वेट्रेसपर्यंत 7 कडक बंधनं, नवे नियम काय ?, पब, बार मालकांभोवतीचा फास आवळला
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 10:06 AM

पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरण सध्या खूप गाजत आहे. दोन आठवड्यापूर्वी नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून बाईकला धडक दिली व त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी व त्याचे काही मित्र पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांचे व्हिडीओही समोर आले होते. अल्पवयीन मुलांना दारू दिलीच कशी असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. अपघात प्रकरणानंतर आता इतर पब आणि बार मालकांचे धाबे दणाणले आहेत. कारण या अपघातानंतर काही पबमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरही विरोधकांनी गंभीर आरोप केले. आता या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान या हिट अँड रन प्रकरणानंतर नियमांचे उल्लघंन करणारे पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे.. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या विभागाच्या उच्चस्तरीय बैठकी मध्ये पुणे सारखे प्रकार रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहेत नवे नियम ?

१) परवाना कक्षा मध्ये २१/२५ वयाखालील व्यक्तीनां बियर/मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार

२) हॉटेल च्या ओपन टेरेसवर ( rooftop) मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार.

३) उत्पादन शुल्क विभागाने नियमाने दिलेल्या वेळेनंतर अनुद्यप्ति सुरू असल्यास कारवाई केली जाणार

४) शहरी भागात दीडवाजेपर्यंत तर ग्रामीण भागात ११ वाजेपर्यंतच आस्थापन सुरू ठेवण्याच्या सूचना

४) महिला वेट्रेस ठराविक वेळेनंतर कार्यरत असल्यास कारवाई संबधित आस्थापनावर कडक कारवाईच्या सूचना.

५) विनापरवाना मद्यसाठा सापडल्यास कायदेशीर कारवाई करावी व संबधित मद्यसाठाचे सखोल निरीक्षण करावे.

६) तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ब्लॅक लिस्टेड (Ban Party) परमिट रूम व बियर शॉप यांनी एफएल-१ ट्रेड मधुन Cash andh Carry scheme पध्दतीने मद्यसाठा ख़रेदी करने बंधनकारक राहणार आहे.

७) या शिवाय विभागातील अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता, गोडाऊन आणि कारखान्यावरील उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची त्या त्या विभागीय कार्यालयात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच स्थानिक कार्यालयातून तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने परिसरातील पब आणि रेस्टोरंटमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची संरचना उत्पादन शुल्क विभागाकडून उभी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञान व CCTV च्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार व रेस्टोरंटमध्ये होणारे अवैध धंदे, नियमांचे होणारे उल्लंघन यावर नजर ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली

अल्पवयीन मुलाची होणार चौकशी

कल्याणीनगर येथे दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेला तो अल्पवयीन आरोपी सध्या बालसुधारगृहात आहे. या आरोपी पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र लिहीण्यात आलं आहे. अल्पवयीन आरोपीचे नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशी होऊ शकते.

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.