PM Modi | पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी, रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक, देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरवोद्गार

मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज, संतगण आणि उपस्थित वारकऱ्यांना जय हरी. स्वताला भाग्यशाली समजतो, म्हणून या प्रसंगी मोदींसोबत मला उपस्थित राहता आलं. मी नितीन महाराजांचे आभार मानतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं.

PM Modi | पंतप्रधान मोदी हे खरे वारकरी, रंजल्या-गांजल्यांची सेवा करणारे प्रधान सेवक, देवेंद्र फडणवीसांकडून नरेंद्र मोदींसाठी गौरवोद्गार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 3:13 PM

पुणेः गोरगरीबांसाठी योजना राबवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे खरे वारकरी आहेत. रंजल्या-गांजल्यांसाठी ते अनेक योजना राबवत आहेत. त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करत आहेत. वारकरी संप्रदायाचे हे सूत्र ते तंतोतंत पाळत असल्याचं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे गौरवोद्गार काढले. हा अत्यंत अभिमानाचा सोहळा आहे. शीळा मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातच नाही जगात लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी आलेले आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज, संतगण आणि उपस्थित वारकऱ्यांना जय हरी. स्वताला भाग्यशाली समजतो, म्हणून या प्रसंगी मोदींसोबत मला उपस्थित राहता आलं. मी नितीन महाराजांचे आभार मानतो, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांसारखेच काम करत आहेत, हे सांगता फडणवीस म्हणाले, ‘ वारकऱ्यांच्या मंत्राने रंजल्या-गांजल्यांसाठी काम करणारे आपले पंतप्रधान मोठे आहेत. आपले पंतप्रधान प्रधान सेवक आहे. याच मंत्राने ते जनतेची सेवा करत असतात. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हेच वारकऱ्यांचं सूत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी जे संपूर्ण जग आपलं आहे, असं सांगितलं. त्या जगाला आपलं मानून, कोरोना काळात संपूर्ण जगाला लसींचा पुरवठा करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली. समाजात नैराश्य होतं. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धेत समाज लीन होता, शोषण होत होता. भागवत संप्रदायाची पताका घेऊन संतांनी भागवत संप्रदाय, समाज उभा केला. ज्ञानेश्वरांनी पाया रचला आणि तुकाराम महारांजांनी कळस रचला. समाजातील सर्व स्तरांपर्यंत, बहुजनांपर्यंत भागवत धर्म नेला. हे शब्दाचं धन ज्या प्रकारे त्यांनी दिलं, त्यात खूप ताकद होती. इंद्रायणीत बुडवलं की शीळेनी बंद केले तरी ते तुकोबांचे शब्द पुन्हा वर आले आणि जना-जनाला व्यापलं. त्या मार्गानी चालण्याचं कामच पंतप्रधान करत आहेत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देहूबद्दल पंतप्रधान काय म्हणाले?

देहू येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘ देहूत पांडुरंग नांदतो. देहूत पांडुरंगांचा निवास आहे, आमि प्रत्येक जण भक्तीने ओतपोत संत स्वरुप आहे. म्हणून नागरिक, माता, भगिनींना नमन करतो. काही दिवसांपूर्वी पालखी मार्ग फोर लेन करण्यासाठी उद्घाटन करण्याचा मान मिळाला. तीन चरणात काम पूर्ण होईल. 350 किमी पेक्षा जास्त अंतराचे हायवे होतील. 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करमार, या क्षेत्राता विकास होईल. ज्या शिळेवर तुकाराम महाराांनी 13 दिवस तपस्या केली असेल, ती शीळा फक्त शीळा नव्हे ती भक्ती आणि ज्ञानाची आधारभूत शीळा आहे. या क्षेत्राच पुननिर्माण करण्यासाठी आभार व्यक्त करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.