पुण्याकडे निघालेल्या बसचा टायर फुटून भीषण अपघात, थेट 25 फूट खाली कोसळली

लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅकला या बसने धडक दिली. त्यानंतर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली कोसळली.

पुण्याकडे निघालेल्या बसचा टायर फुटून भीषण अपघात, थेट 25 फूट खाली कोसळली
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 10:47 AM

Pune Private Bus Accident : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अपघातांचे सत्र सुरु आहे. त्यातच आता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळील एका खाजगी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दहा ते अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मुख्य महामार्गावरून ही बस जवळपास 25 फूट खाली कोसळली. सध्या इंदापूर पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लोखंड वाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर एका खासगी प्रवाशी बसचा अपघात झाला. ही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी इंदापूरपासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर या बसचे दोन्हीही टायर फुटले. यामुळे लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅकला या बसने धडक दिली. त्यानंतर ही बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली कोसळली.

बसचे टायर फुटल्याने अपघात झाल्याची माहिती

सोलापूर जिल्ह्यातील सांगोलामधून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. ही खासगी बस MH 04 KF 5969 क्रमांकाची होती, अशी माहिती मिळत आहे. तर इंदापूरपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असलेला TN 93 B 3062 क्रमांकाचा मालवाहू ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी बसचे टायर फुटल्याने ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकमध्ये असलेले लोखंड रस्त्यावर पडले होते. तर अपघातग्रस्त बस पुणे सोलापूर महामार्ग ओलांडून थेट 25 फूट रोडच्या बाहेर जाऊन पडली.

या बस मध्ये नेमकी किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र या बसमधील 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस आणि एन एच ए आयचे पथक या ठिकाणी दाखल झाले आहेत

कोणतीही जीवितहानी नाही

सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण बस आणि या खाजगी मालवाहू ट्रकचे मोठ्या नुकसान झालं आहे. या बसमध्ये 10 ते 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इंदापूर पोलीस महामार्गावर अपघातग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचे काम करत असून पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.