मंदिरं, धार्मिक स्थळं बंदच राहणार, गणेशोत्सवाचं काय होणार? अजित पवारांचं थेट उत्तर

पुण्यातील दुकानं, हॉटेल्सना वेळ वाढवून देण्यात आली आहे. तर मॉल्सही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळं आणि गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसंच याबाबत बोलताना राज्यातील नागरिकांना अजितदादांनी महत्वाचं आवाहनही केलं आहे.

मंदिरं, धार्मिक स्थळं बंदच राहणार, गणेशोत्सवाचं काय होणार? अजित पवारांचं थेट उत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 5:42 PM

पुणे : व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमतं घेत अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार पुण्यातील दुकानं, हॉटेल्सना वेळ वाढवून देण्यात आली आहे. तर मॉल्सही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी अजित पवार यांनी राज्यातील मंदिरं, धार्मिक स्थळं आणि गणेशोत्सवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसंच याबाबत बोलताना राज्यातील नागरिकांना अजितदादांनी महत्वाचं आवाहनही केलं आहे. (What did Ajit Pawar say about temples, religious places and Ganeshotsav in the state?)

राज्यातील मंदिरं सुरु होणार का?

राज्यातील मंदिर, अन्य धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत काही निर्णय होऊ शकतो का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज्य सरकारच्या स्तरावर निर्णय होईल. जिल्हा पातळीवर अशाप्रकरचा कुठलाही निर्णय होणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यातील मंदिरे, अन्य धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत अद्याप कुठल्याही निर्णयाची शक्यता नसल्याचं पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाबाबत अजितदादा काय म्हणाले?

गणेशोत्सवाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होत असते. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई, पुण्यातील महत्वाच्या आणि मोठ्या गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करत असतात. साधारणपणे एक गोष्ट लक्षात आलीय की जिते लोकांची गर्दी होते तिथं कोरोनाचा फैलाव वाढतो. उदाहरण घ्यायचं झालं तर पंढरपूर, माळशिरसमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर वाढला आहे. करमाळा पॉझिटिव्हिटी रेट 9.2, पंढरपूरमध्ये 8.6, माढा 7.7, माळशिरस 7.4 टक्के आहे. त्यामुळे हे निर्विवादपुणे पुढं आलं आहे की जिथे गर्दी होते तिथे कोरोना वाढतो. त्यामुळे या काळात आपण आपल्या उत्साहाला मुरड घातली पाहिजे. काही थोडीशी बंधनं पाळली पाहिजेत. त्याला विलाज नाही. हे करावंच लागेल आणि सगळ्यांना ऐकावंच लागेल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना इशारा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट साडे तीन टक्क्याच्या आसपास आला आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांची मागणी लक्षात घेता शिथिलता देण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली. त्यानंतर आज शिथिलता देण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या वर गेल्यास पुन्हा कठोर निर्बंध लागू केले जातील असा इशारा अजितदादांनी दिलाय. तसंच सरकारनं घालून दिलेले सर्व नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुकानदार, त्यांचे कर्मचारी त्यांनी मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

पुण्यात निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार आता पुण्यात

>> सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार >> हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार >> शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी >> मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश

संबंधित बातम्या :

Pune Corona Update : ‘शिथिलता दिली आहे, पण….’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?

What did Ajit Pawar say about temples, religious places and Ganeshotsav in the state?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.