Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drug Destruction Day : तब्बल 2 हजार किलो ड्रग्ज नष्ट, अमली पदार्थ निर्मूलन दिनानिमित्त पुण्यात कारवाई

देशभरातही अशाप्रकारे अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांचा विळखा तरुणाईला जास्त बसत आहे. त्याचे आजच्या तरुणाईवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ निर्मूलन दिनी अशाप्रकारची कारवाई केली जाते.

Drug Destruction Day : तब्बल 2 हजार किलो ड्रग्ज नष्ट, अमली पदार्थ निर्मूलन दिनानिमित्त पुण्यात कारवाई
ड्रग्ज नष्ट करण्याच्या कारवाईत सहभागी कर्मचारीImage Credit source: punekarnews
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 12:51 PM

पुणे : पुण्यात तब्बल 2 हजार 439 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले आहे. पुणे सीमा शुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. काल (8 जून) झालेल्या अमली पदार्थ निर्मूलन दिनाच्या (Drug Destruction Day) पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. मेसर्स महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड, MIDC, रांजणगाव येथील अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन-आधारित इन्सिनरेशन सुविधेमध्ये हे ड्रग्ज नष्ट करण्यात आले. मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या (Muktangan rehabilitation centre) संचालिका मुक्ता पुणतांबेकर तसेच समन्वयक सोनाली काळे यांनीही या कारवाईला हजेरी लावली. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करीविरुद्ध मजबूत संदेश देण्यासाठी, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42,054 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ, 17,10,845 गोळ्या, 72,757 खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या आणि 136,364 किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट केले.

निर्मला सीतारामन यांच्याकडून कौतुक

कारवाईचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची विल्हेवाट लावली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी CBICच्या अधिकार्‍यांचे अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि मुक्तांगण पुनर्वसन केंद्रासारख्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची प्रशंसादेखील केली. तरुणांसोबत मोठ्या प्रमाणावर या संस्था काम करतात, अंमली पदार्थांच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करतात. या सर्वांबद्दल त्यांनी या संस्थांचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

व्यसनाधीनता सोडण्याचा संदेश

देशभरातही अशाप्रकारे अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांचा विळखा तरुणाईला जास्त बसत आहे. त्याचे आजच्या तरुणाईवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ निर्मूलन दिनी अशाप्रकारची कारवाई केली जाते. यादिवशी अमली पदार्थ नष्ट करून एक संदेश देण्यात येतो. पुण्यातही अशाप्रकारे अंमली पदार्थ नष्ट करून व्यसनाधीनता सोडण्याचा संदेश देण्यात आला.

संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.