Pune crime : अस्तित्वात नसलेल्या कंपनीत गुंतवले 21 लाख; फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर पुण्यातल्या वाकड पोलिसांत घेतली धाव

हितेश आणि संजय अशी ओळख सांगणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि 420 आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime : अस्तित्वात नसलेल्या कंपनीत गुंतवले 21 लाख; फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर पुण्यातल्या वाकड पोलिसांत घेतली धाव
गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 5:08 PM

पुणे : पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणारी आणखी एक घटना पुण्यात घडली आहे. एका 48 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत (Forex trading company) पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून दोन व्यक्तींनी 21.66 लाख रुपयांची फसवणूक (Duped) केली आहे. परतावा पूर्ण न झाल्याने त्या व्यक्तीने वाकड पोलीस स्टेशन (Wakad police) गाठले आणि एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावचा रहिवासी असलेला हा व्यक्ती इंटरनेटवरून फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात आला. जुलै 2021मध्ये, फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ‘ट्रेडशॉटएफएक्स’ या फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवले, जी अस्तित्वात नव्हती. त्यानंतर त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केलेल्या इतर अनेकांनी केलेल्या आर्थिक नफ्याची माहिती असलेले काही स्क्रीनशॉट फॉरवर्ड केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अलगद अडकला जाळ्यात

तक्रारदाराने कथितपणे कंपनीच्या वेबसाइटला भेट दिली, जिथे त्याला गुंतवणूकदारांनी केलेल्या नफ्याबद्दल अशीच माहिती मिळाली आणि या जाळ्यात अलगद अडकला. केवायसी कागदपत्रे जमा केल्यानंतर त्याने कंपनीत ऑनलाइन खाते उघडले आणि तेथे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. घोटाळेबाजांनी कथितपणे त्या व्यक्तीला माहिती दिली, ज्यामुळे तो नफा कमावत असल्याचे दिसून आले.

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले, की व्यक्तीने बँक खाती आणि UPIद्वारे सुमारे 21.66 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतर आणि खात्रीशीर परतावा न मिळाल्याने त्याने सोमवारी पोलीस तक्रार दाखल केली. हितेश आणि संजय अशी ओळख सांगणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 406 आणि 420 आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.