Pune fire | शहरात दिवसभरात विविध ठिकाणी आगीच्या 4 घटना ; जीवितहानी नाही, लाखो रुपयांचे नुकसान

| Updated on: Mar 05, 2022 | 6:19 PM

अग्नीशामक दलाच्या प्रयत्नानंतर 1  तासात आग आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक गवत पेटल्याने शेजारीच टाकाऊ वस्तु ठेवलेल्या एका बंद खोलीत आग लागल्याची घटनाही नुकतीच घडली आहे.

Pune fire | शहरात दिवसभरात विविध ठिकाणी आगीच्या 4 घटना ; जीवितहानी नाही, लाखो रुपयांचे नुकसान
fire at Balewadi
Follow us on

पुणे- शहरात आगीच्या घटनांमध्ये दिवंसेदिस वाढ होताना दिसून येत आहे.  चिंचवड रेल्वे स्टेशन(Chinchwad Railway Station) जवळील पाच दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे लागली.  या आगीमध्ये पत्र्याच्या शेडची असलेली ही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. शॉर्टसर्किटमुळे ( short circuit) आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आग लागल्याची ,माहिती मिळताच अग्नीशामक जवान घटना स्थळावर दाखल झाले. अग्नीशामक दलाच्या प्रयत्नानंतर 1  तासात आग आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर बालेवाडी स्टेडियम (Balewadi Stadium) येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक गवत पेटल्याने शेजारीच टाकाऊ वस्तु ठेवलेल्या एका बंद खोलीत आग लागल्याची घटनाही नुकतीच घडली आहे.

दापोडी रेल्वे स्टेशन येथे रीले रूममध्ये आग

दापोडी रेल्वे स्टेशन येथे सिग्नल यंत्रणाअसलेली रीले रूममध्ये आग लागल्याची घटना नुकतीच घडली. आगीच्या घटनेमुळे पुणे ते लोणावळा दरम्यानच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टायर्सला आग

त्यानंतर पिंपरी चिंचवड मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे येत असताना अपघाती वळणावर ठेवण्यात आलेल्या टायर्सला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या आगीत महामार्गावरील टायर पूर्णपणे जळून राख झाले आहेत. पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग समाप्त होत असताना अवघड वळण असल्याने त्याठिकाणी प्रशासनाकडून टायर्स लावण्यात आले होते टायर्सना आग लागून ते जळून खाक झाले आहेत ह्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे.

हॉटेल चैत्रालीला शॉर्टसर्किटमुळे आग

बारामती शहरातील गुणवडी चौकात असलेल्या हॉटेल चैत्रालीला सकाळी अचानक आग लागली.  यामध्ये हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. हे हॉटेल पूर्णपणे जळुन खाक झाले असून शेजारीच असलेल्या एका इमारतीची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .बारामती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

IND vs SL: रोहितने विराटला मैदानात दिला असा खास सन्मान, जे बोलला ते करुन दाखवलं, पहा VIDEO

Akola Bullock Cart Race | अकोला जिल्ह्यात काळ्या मातीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

युक्रेनमध्ये अडकली होती अमरावतीची नेहा, मायदेशी परतल्यावर सांगितला थरारक अनुभव!