Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TET exam scam | 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी केली जप्त, डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु

2018 व 2019-20 अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत. 2018 च्या गुन्ह्या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे

TET exam scam | 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी केली जप्त, डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु
pune-police
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 10:10 AM

पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणीची( TET exam scam ) व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी 650 बोगस प्रमाणपत्र पुणे सायबर पोलिसांनी (cyber Police) जप्त केली आहेत. तर राज्य परीक्षा परीषदेकडे बाेगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा राज्य परीक्षा परिषदेला मिळाला आहे. आतापर्यंत 2019-20 च्या परिक्षेतली 400 तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात उघड केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त केली आहेत. जी ए सॉफ्टवेअर कडून जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police )दिली आहे.

स्वतंत्र गुन्हे दाखल

2018 च्या टीईटी परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केलाच तपासात उघड झाले आहे. 2018 व 2019-20 अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत. 2018 च्या गुन्ह्या प्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन 12 आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये 2018 च्या परीक्षेत 1 हजार 778 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आरोपींकडे चौकशी सुरूच

या घोटाळ्यात ज्या अपात्र उमेदवारांनी पात्र होत दलालांना पैसे दिले आहेत . त्यांनी स्वतः होऊन पुढं येत माफीचा साक्षीदार व्हावे असे आवाहनही पोलिसनाकडून करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यातून दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. चौकशी दरम्यान एका आरोपी या घोटाळ्याची पाळंमुळं बिहार पाटण्यापर्यंत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्‍नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोगामिंग कोड) छेडछाड करून प्रश्‍नपत्रिका फोडतात. परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड करून गैरप्रकार केले जातात. असे तपासादरम्यान समोर आले आहे.

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ

भव्यदिव्य सेट, सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला

सुगंधी चंदनाची इनोव्हातून तस्करी; नाशिकमध्ये ‘पुष्पा’ला बेड्या, कितीचे घबाड सापडले?

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.