मावशी आणि भाचा धरणावर फिरायला गेले होते, पण ही पिकनिक त्यांची अखेरची ठरली !

सध्या उन्हाळी सुट्टी सुरु आहे. त्यामुळे सर्वजण आपल्या मुलांना घेऊन सहलीचे आयोजन करत आहेत. असाच भाच्यासोबत सहल एन्जॉय करण्याचा प्लान मावशीने केला. पण मजा करण्याऐवजी काहीतरी भलतंच घडलं.

मावशी आणि भाचा धरणावर फिरायला गेले होते, पण ही पिकनिक त्यांची अखेरची ठरली !
मावशीसोबत पिकनिकला गेलेला मुलगा धरणात बुडालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 7:50 PM

रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे : पुण्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मावशीसोबत पिकनिकला आलेला 10 वर्षाचा मुलगा कुसगाव धरणात बुडाल्याची घटना घडली. धरणाच्या पाण्यात खेळताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच शिरगाव परंदवाडी पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला पाण्यातून बाहेर काढले. तात्काळ मुलाला सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मावशीसोबत हडपसर येथून धरणावर फिरायला आला होता

हडपसर येथून मावशी पल्लवी साळवे सोबत सदर मुलगा मावळ तालुक्यातील कुसगाव धरणावर फिरण्यासाठी आला होता. मावशी आणि भाचा पाण्यात खेळत होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि मुलाचा शोध सुरु केला. मुलाचा शोध घेऊन त्याला पाण्यातून बाहेर काढत तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशनचे पीएसआय गावित, पोलीस हवालदार जॉन पठारे, पोलीस नाईक खेडकर आणि निलेश संपतराव गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे, ग्रामस्त राजाराम केदारी आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

हे सुद्धा वाचा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.