कॉलेज तरुणाने धरणाजवळ सेल्फी काढला,अन् धरणात झेप घेत स्वत:ला संपविले

स्वतःचा फोटो काढून तो व्हॉट्सअपवर नातेवाईकांना पाठवून एका महाविद्यालयीन युवकाने धरणात उडी मारुन स्वत:ला संपविण्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे...

कॉलेज तरुणाने धरणाजवळ सेल्फी काढला,अन् धरणात झेप घेत स्वत:ला संपविले
student ended his life by jumping into Khadakwasla dam
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 9:11 PM

पुण्यातील खडकवासला धरणाजवळ मोबाईलने सेल्फी काढून आपल्या कुटुंबियांना मोबाईलवरील  व्हॉट्सअपवर पाठवून देत एका कॉलेज विद्यार्थ्याने स्वत:ला धरणात उडी घेत संपविल्याची घटना घडली. हा विद्यार्थी आपल्या वडीलांना शिवाजीनगरात क्लासला जाऊन येतो असे सांगून घरातून निघाला होता. त्याने अशा प्रकारे स्वत:ला संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  या घटनेने तरुणाच्या नातेवाईकांसह मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

पुण्यातील तुडुंब भरलेल्या खडकवासला धरणाला भेट घेण्यासाठी साहिल संजय कुमार ( वय 22 ) आला होता. त्याने आधी मोबाईलने सेल्फी काढला आणि धरणात सरळ स्वत:ला  झोकून दिले. धरणात पावसाने प्रचंड पाणी असल्याने त्याचा काही थांगपत्ता लागला नाही.  हवेली पोलिसांच्या रेक्स्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ,गुलाब भोडेंकर संजय चोरगे यांच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता साहिल याचा मृतदेह धरणातुन बाहेर काढण्यात आला.

आईला घरी येत असल्याचे सांगितले पण…

साहिल संजय कुमार ( वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. हवेली पोलिस ठाण्याचे अमंलदार संतोष तोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साहिल हा काल बुधवारी (20 ऑगस्ट ) सकाळी सात वाजता शिवाजीनगर येथे क्लासला गेला होता. वडीलांनी दुपारी दोन वाजता त्याला फोन केला असता त्याने फोन घेतला नाही.  दुपारी साडेतीन वाजता साहिल याने त्याच्या  आईला फोन करून आपण घरी येत असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र त्यानंतर 4.15  वाजता साहिलने खडकवासला धरणाच्या बॅकग्राऊंडला  स्वतःचा फोटो काढून वडीलांसह नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवर  पाठवला. त्यामुळे आई वडिलांनी तातडीने खडकवासला धरणावर धाव घेतली.  मात्र साहील काही सापडला नाही. त्यामुळे वडील संजय कुमार यांनी गुरुवारी सकाळी घोरपडी पोलिस चौकीत साहिल बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली. त्यानंतर साहिलचा शोध सुरु करण्यात आला, परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता…

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.