Video : शंभर फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकला होता कुत्रा, बचावपथकानं काढलं सुखरूप बाहेर

पुण्याच्या खेड (Khed) तालुक्यातील आंबेठाण येथील शंभर फूट खोल विहिरीत (Well) दोन दिवसांपासून एक कुत्रा () पडला होता. या अडकलेल्या कुत्र्याला नेचर गार्ड ऑर्गनायझेशन व चाकण रेस्क्यू (Rescue) टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले आहे.

Video : शंभर फूट खोल विहिरीत दोन दिवसांपासून अडकला होता कुत्रा, बचावपथकानं काढलं सुखरूप बाहेर
विहिरीत अडकलेल्या कुत्र्याला बचाव पथकानं काढलं बाहेरImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:45 AM

पुणे : पुण्याच्या खेड (Khed) तालुक्यातील आंबेठाण येथील शंभर फूट खोल विहिरीत (Well) दोन दिवसांपासून एक कुत्रा (Dog) पडला होता. या अडकलेल्या कुत्र्याला नेचर गार्ड ऑर्गनायझेशन व चाकण रेस्क्यू (Rescue) टीमच्या सदस्यांनी जीवनदान दिले आहे. आंबेठाण येथील 100 फूट खोल विहिरीत हा कुत्रा पडला होता. या विहिरीला पायऱ्याही नाहीत. त्या विहिरीत हा कुत्रा पडला होता, त्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर येणे शक्य नव्हते. त्याला विहिरीमधून जवळपास 3 तास बचावकार्य करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, सचिन भोपे, विक्रांत चौधरी, प्रशांत अष्टेकर, मयूर, श्रीकांत साळुंके व हितेश घुगरे यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी आतापर्यंत अनेक प्राण्यांना बचावकार्याच्या माध्यमातून जीवदान दिले आहे.

पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन

पायऱ्या नसल्यामुळे प्रथम विहिरीत मोठी दोरी टाकण्यात आली. त्याच्या सहाय्याने बचाव पथकातील एक सदस्य विहिरीत उतरला. त्यानंतर कुत्र्याला बाहेर कसे काढायचे याची चर्चा विहिरीतील आणि विहिरीच्या बाहेरील सदस्यांनी केली. मग दोरीच्या सहाय्याने कुत्र्याला व्यवस्थित आणि सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्याला इजा होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. व्हिडिओ पाहा –

आणखी वाचा :

Big Breaking : पुण्यातली स्फोटांची मालिका संपेना, चाकण औद्योगिक वसाहतीतही मोठा ब्लास्ट

Rajiv Gandhi Zoological Park : प्राण्यांनाही वाटेल गारेगार; उन्हापासून वाचण्यासाठी कात्रजच्या प्राणीसंग्रहालयात आता फॉगर

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.