पुण्यात घर ,जमिनीचे दर गगनाला भिडणार ; रेडीरेकनरमध्ये ‘इतक्या’ टक्के वाढ प्रस्तावित
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. गतवर्षात झालेल्या खरेदी - विक्री व्यवहारांच्या आधारावर सरासरी नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
पुणे – येत्या आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने (Department of Registration and Stamp Duty) पुणे व पिंपरी चिंचवड (Pimpri – Chinchwad ) शहरात जमिनीच्या अर्थात वार्षिक बाजारमूल्य दरात सरासरी 6 टक्के तर ग्रामीण भागात 10 टक्के वाढ, तर नगरपालिका क्षेत्रात 5 टक्के प्रस्तावित आहे. या दरवाढीस परवानगी मिळाल्यानंतर येत्या एक एप्रिलपासूनही दर वाढ लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या(Collector) अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. गतवर्षात झालेल्या खरेदी – विक्री व्यवहारांच्या आधारावर सरासरी नवे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
मोठ्या प्रकल्पांची निर्मिती पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये येत्या काही वर्षात मोठाले प्रकल्प सुरु होत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, रेल्वे मार्ग, एमआयडीसी, महामार्गांचे रुंदीकरण, टाऊनशीप स्कीम आदी प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील हे मोठे प्रकल्प, नव्याने येणाऱ्या कंपन्या यामुळे ग्रामीण भागात जमिनींचे दर वाढविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पुणे शहारातील रेडीरेकनर दरवाढ
2017 -18 – 3.64 टक्के ,
2018- 19 – वाढ नाही ,
2019 -20 वाढ नाही,
2020-21 – 1.25 टक्के
2021-22 – वाढ नाही ,
२०२२-२३ – ६ टक्के प्रस्तावित
ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरवाढ 2017 -18 – 15.30 टक्के ,
2018- 19 – वाढ नाही ,
2019 -20 वाढ नाही ,
2020-21- 1.8 टक्के ,
2021-22 – वाढ नाही ,
2022-23 – 10 टक्के प्रस्तावित
IND vs WI, 1st T20I, LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहता येईल भारत-वेस्ट इंडिजमधला पहिला टी-20 सामना
रश्मी ठाकरेंच्याविरोधात सोमय्यांना दारुगोळा कुणी पुरवला? कोण आहेत मेधाजी? सोमय्यांकडूनच ऐका