अजितदादांचा आणखी एक मोहरा थोरल्या साहेबांच्या गळाला; शरद पवार गटाने गळ टाकलाच, खेडमध्ये शिजतंय काय?

NCP Khed Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापू्वीच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय हालचाली सुरू आहे. एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. पुण्यात लोकसभेचा चमत्कार महायुती विसरलेली नाही. पण राजकीय धक्के थांबवता येत नाहीये.

अजितदादांचा आणखी एक मोहरा थोरल्या साहेबांच्या गळाला; शरद पवार गटाने गळ टाकलाच, खेडमध्ये शिजतंय काय?
खेड-आळंदीमध्ये तुतारी कुणाच्या हाती?
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 9:24 AM

अजित पवार यांना पुणे जिल्ह्यात विधानसभेचे गणित अधिक पक्के करावे लागणार असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीतील चमत्कार अजूनही महायुतीसाठी अनाकलनीय आहे. त्यानंतर महायुतीने विधानसभेसाठी राज्यात मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी सुरूंग कुठे लावायचा आणि मोहरे कसे आपल्याकडे वळवायचे याकडे शरद पवार गटाने कसून गृहपाठ केला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील रणसंग्रामात मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही खेड तालुक्यात असाच प्रयोग रंगला आहे आणि त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे.

अनिल राक्षे यांची नाराजी दूर होणार का?

अजित पवारांच्या खेड दौऱ्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल बाबा राक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. राक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच त्यांनी कोल्हे सोबत भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीचे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. राक्षे जर सोबत आले तर या मतदारसंघातील समीकरणं पार बदलून जातील. महायुतीची त्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आता महायुती, पर्यायाने अजितदादा राक्षे यांची नाराजी दूर करणारा का? हा कळीचा मुद्दा आहे.

हे सुद्धा वाचा

डॅमेज कंट्रोलसाठी कंबर कसावी लागणार

अजित पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख आसलेले आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांनी अजित दादांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली होती. परंतु डॉ. अमोल कोल्हे यांच्या खेड तालुक्यातील दौऱ्यात अनिल राक्षे यांची हजेरी अग्रस्थानी दिसली. रात्री उशिरा राक्षे यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ. कोल्हे यांनी जेवणाचा आस्वादही घेतला. त्यामुळे आता अजित पवार गटाला पुणे जिल्ह्यात डॅमेज कंट्रोलसाठी पावलं टाकणं गरजेचे झाले आहे.

अनिल राक्षे यांच्या हाती तुतारी

या सर्व घडामोडींमुळे इंदापूरनंतर आता महायुतीसाठी हा मतदारसंघ पण डोकेदुखी वाढवणारा ठरणार तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची भेट घेतल्यानंतर अनिल राक्षे तुतारी फुंकणार आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनिल बाबा राक्षे खेड आळंदी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहे, ही गोष्ट काही लपलेली नाही.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.